Swasthyam: पुण्यात ‘स्वास्थ्यम्’च्या कार्यक्रमाचं आयोजन; कधी, कुठे? जाणून घ्या

'स्वास्थ्यम्’ मागील वर्षील लोकप्रिय आणि बहुचर्चेत असलेल्या उपक्रमाचे दुसरं पर्व ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’चं पुण्यात आयोजन केलं जाणार आहे.
Swasthyam
SwasthyamSaam tv
Published On

Pune News:

‘स्वास्थ्यम्’ मागील वर्षील लोकप्रिय आणि बहुचर्चेत असलेल्या उपक्रमाचे दुसरं पर्व ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’चं पुण्यात आयोजन केलं जाणार आहे. 'स्वास्थ्यम्'चा हा उपक्रम पुण्यातील कर्वेनगरमधील डीपी रोड जवळील पंडित फार्म येथे एक ते तीन डिसेंबरला आयोजित केला जाणार आहे. (Latest Marathi News)

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’चा हा तीन दिवसीय उपक्रम असणार आहे. या उपक्रमात वेलनेस, योग-प्राणायाम, मेडिटेशन, भावनिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक वर्तणूक, स्वास्थ्यपूर्ण आरोग्याविषयी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक संवाद साधणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Swasthyam
Maratha Aarakashan: मराठा आंदोलकांच्या आडून समाजकंटकांनी आंदोलनाला हिंसक वळण दिलं: देवेंद्र फडणवीस

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ च्या अध्यात्म, योग व स्वास्थ्यपूर्ण आरोग्याच्या उपक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होण्याची मोठी संधी आहे.

‘स्वास्थ्यम्’च्या या उपक्रमाचे उपक्रमाचे मुख्य प्रायोजक सुहाना मसाले आहेत. तर सह-प्रायोजक पुण्यातील निरामय वेलनेस सेंटर आणि शारंगधर नॅचरल हेल्थ केअर असणार आहेत. याचबरोबर सहयोगी प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड असणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे ईव्ही पार्टनर एथर आहेत.

गेल्या वर्षीही ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाचा तीन दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या उपक्रमात गुरू श्री एम., गुरू संत श्री गौरांग दास, माँ हंसाजी योगेंद्र, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख व प्रसिद्ध लेखक आणि कवी कुमार विश्वास यांनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच या उपक्रमात ‘स्वास्थ्यम्’ या आरोग्याच्या जागरात जवळपास वीस हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते.

‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाचा फायदा काय?

आजच्या धावपळीच्या काळात मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे आवश्यक झाले आहे. सध्याच्या काळात लोकांमध्ये चिंता, काळजी, भीती, ताण-तणाव वाढू लागले आहेत. यामुळे मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. याकारणात्सव ‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.

संस्कृत व वैदिक मंत्रांचा जप

संस्कृत आणि वैदिक मंत्राचा जप केल्यामुळे मनुष्याची एकाग्रता वाढते. हा मंत्र जप केल्यामुळे हृदयाची स्पंदने नियमित होऊन हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

ध्यान-धारणेविषयी माहिती

आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालू ठेवण्याची ही जबाबदारी मेंदूची असते. त्यामुळे मेंदूचे कार्य अतिशय संतुलित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित ध्यान-धारणा आवश्यक आहे.

Swasthyam
Pune Fraud: डेटिंग ॲपवर ओळख, सुंदर तरुणीच्या जाळ्यात फसला; लॉजवर भेटायला बोलावले अन्.. तरुणासोबत घडलं भयंकर

आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम

मन आणि श्‍वासाच्या नियंत्रणासाठी ‘प्राणायामा’चा अभ्यास हा महत्त्वपूर्ण आहे. या प्राणायाम केल्यामुळे प्राणशक्ती संतुलित होतो, पुढे या व्याधींचा नाश होतो. प्राणायाम नियमित केल्यामुळे शरीर, इंद्रिये आणि मन निरोगी ठेवण्यास मदत होते.

अध्यात्म व सुदृढ आरोग्य

अध्यात्म लोकांना जीवनाचा अर्थ व सार सांगते. अधात्मामुळे नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी व चांगल्या संस्कारांचा स्वीकार करण्यास मदत होते. अधात्माचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

संगीताचा आरोग्याशी संबंध

व्यक्तीने आपल्या आवडीचे गाणे किंवा संगीत ऐकल्यावर मन प्रसन्न होतं. खरंतर संगीताचा थेट मनाशी संबंध आहे. मन आणि गायनाचा संगीत कलेचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे.

‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’

'स्वास्थ्यम्' या उपक्रमासंबंधी अपडेट माहिती (उपक्रमाचे वेळापत्रक, मार्गदर्शक व विषय आदी तपशील) दैनिक ‘सकाळ’मधून लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

Swasthyam
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फडणवीसांना फोन; काय झाली चर्चा?

‘स्वास्थ्यम्’ कधी आणि कोठे?

कधी व कोठे? - १ ते ३ डिसेंबर २०२३, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com