Swargate Bus Depot Case: स्वारगेट अत्याचार प्रकरण; नराधमाचा अजून एक कारनामा उघड, दत्तात्रय गाडे पोलिसांचा गणवेश घालून फिरायचा

Swargate Bus Depot Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचे अनेक कारनामे पोलिसांच्या तपासात पुढे येऊ लागले आहेत.
Swargate Bus Depot Case
Swargate Bus Depot Case Saam Tv
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या अनेक कारनामे समोर येत आहेत. स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेबाबत नवीन माहिती पोलीस तपासात उघड झालीय. आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश घालून फिरत असल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. गाडे पोलीस असल्याचे सांगून एसटी स्थानक परिसरात मिरवत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.

Swargate Bus Depot Case
Swargate Bus Depot Case: शिवशाही अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट; दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी पूर्ण, तपासाला वेग येणार

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचे अनेक कारनामे पोलिसांच्या तपासात पुढे येऊ लागले आहेत. आरोपी गाडेच्या मोबाईल फोनमध्ये त्याने पोलीस गणवेश परिधान केलेले फोटो पोलिसांना मिळाले आहेत. गाडेचा एका फोटो हाती लागला असून, त्यामध्ये त्याने पोलिसांचा गणवेश अंगावर परिधान केल्याचे दिसून येते आहे.

Swargate Bus Depot Case
Swargate Bus Deopt Case: शिवशाही अत्याचार प्रकरणात ट्विस्ट; पीडित तरुणीबाबत फलटण पोलिसांकडून मोठा खुलासा

गाडे पोलीस असल्याचे सांगून एसटी स्थानक परिसरात मिरवत असायचा. आरोपी गाडेच्या ओळखीचा एक व्यक्ती पिंपरी-चिंचवड पोलीस दलात आहे. गाडे याने त्या व्यक्तीचा गणवेश अंगावर परिधान करून फोटो काढले असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाईलमध्ये हे फोटो आढळून आले होते. दरम्यान, गाडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे लुटमारीचे असून, बहुतांश ठिकाणी त्याने लुटीसाठी महिलांना टार्गेट केले आहे.

Swargate Bus Depot Case
Swargate Deopt Case: शिवशाही बलात्कार प्रकरणात आणखी एक ट्विस्ट,आरोपीच्या वकिलाने केला नवा दावा

गाडेला यापुर्वी विविध प्रकारच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यावेळी गाडेच्या मोबाईलमध्ये असलेले फोटो पोलिसांच्या कसे लक्षात आले नाही. आणि जर पोलिसांच्या निदर्शनास हे फोटो आले होते तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही असा देखील सवाल उपस्थित केला जातो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com