Air India: मुंबईत एअर इंडियाच्या महिला पायलटनं आयुष्य संपवलं, बॉयफ्रेंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Air India Pilot Death News: एअर इंडियाच्या २५ वर्षीय महिला पायलटने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पायलटच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे.
Air India Pilot Sucide
Air IndiaSaam Tv
Published On

मुंबई: (Mumbai Air India Pilot death)  एअर इंडियामध्ये कार्यरत असलेल्या 25 वर्षीय महिला पायलट जोई तानिया चेरियन हिचा मृतदेह मुंबईच्या अंधेरी परिसरातील फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणात दिल्लीतील तिच्या बॉयफ्रेंड डेरिक जोसेफ याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोई आणि डेरिक काही काळापासून एकत्र राहत होते. मंगळवारी रात्री उशिरा दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, डेरिकने जोईला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृतदेहावर काही जखमांचे खुणा आढळल्यामुळे हा संशयाचा विषय ठरला आहे.

Air India Pilot Sucide
Maharashtra Political News: भाजप- राष्ट्रवादीच्या खात्यांवर शिवसेनाचा दावा? शिंदेंना हावीत मलाईदार खाती?

कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप

जोईच्या कुटुंबीयांनी डेरिकवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, डेरिक सतत जोईवर मानसिक दबाव आणत असे आणि तिच्या वैयक्तिक निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की, डेरिकने जोईला मांसाहार सोडण्यासाठी तसेच एअर इंडियामधील नोकरी सोडण्यासाठी जबरदस्ती केली होती. या मानसिक त्रासामुळेच जोईने टोकाचे पाऊल उचलल्याचा त्यांचा आरोप आहे. अद्याप डेरिक याच्याकडून संबंधीत संबंधीत घटनेबद्दल कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 

Air India Pilot Sucide
Maharashtra Weather Update: राज्याला भरली हुडहूडी! उत्तर महाराष्ट्र गारठला, कुठे किती तापमान?

पोलिस तपास सुरू

पोलिसांनी घटनास्थळावरून सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. डेरिकविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांमधील मेसेजेस आणि त्यांच्या परस्पर नातेसंबंधांचीही सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होते, ज्यामुळे ही घटना घडली असावी.

जोईचा वैयक्तिक व व्यावसायिक प्रवास

जोई तानिया चेरियन ही एअर इंडियामध्ये प्रशिक्षित पायलट होती आणि तिचे करिअर यशस्वीपणे सुरू होते. तिच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने नातेसंबंधातील तणाव व मानसिक ताण याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित केली आहे.

Edited By- नितीश गाडगे

Air India Pilot Sucide
Mumbai Local Train: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वेवर आजपासून धावणार 13 एसी लोकल, वेळापत्रक जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com