डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या राजकारण्यांना तुरुंगात टाका, मोकाट फिरू देऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Supreme Court Kalyan Doctor Attack Case: कल्याण शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर हल्ला प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. रमेश म्हात्रे यांच्या याचिकेवर कोर्टाने कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली असून पुढील सुनावणी २८ सप्टेंबरला होणार आहे.
Kalyan Crime: केबिनमध्ये घुसून डॉक्टरला बेदम मारहाण, आधी कॉलर पकडली नंतर लाथाबुक्क्या मारल्या; कल्याण हादरले
Doctor assaulted inside hospital cabin in KalyanSaam Tv
Published On

Supreme Court, Ramesh Mhatre, Kalyan doctor attack : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या विचारांना कडक शब्दांत फटकारले आहे.

कोर्टात नक्की काय घडले?

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायाधीशांचा आक्रमक कल पाहून म्हात्रे यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

राज्य सरकारने म्हात्रे यांच्याविरोधात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर (SLP) न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने म्हात्रे यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी ३ आठवड्यांचा वेळ दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता २८ सप्टेंबर २०२६ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

Kalyan Crime: केबिनमध्ये घुसून डॉक्टरला बेदम मारहाण, आधी कॉलर पकडली नंतर लाथाबुक्क्या मारल्या; कल्याण हादरले
बापाने मुलाला घरातून हाकलण्यासाठी लावली पूर्ण ताकद, पण हायकोर्टाने एकाच वाक्यात गेमच उलटवला, वाचा नेमकं काय झालं?

न्यायालयाचे कडक ताशेरे

सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी विचारले की, डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना अमानुष मारहाण करणे कसे योग्य ठरू शकते? हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नाही तर सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न आहे

अशा लोकांना प्रत्यक्षात स्थानबद्ध (detain) करायला हवे. या लोकांना रस्त्यावर मोकळे फिरण्याचा कोणताही अधिकार नाही. समाजात या संदर्भात एक अतिशय कडक संदेश गेला पाहिजे.
— सर्वोच्च न्यायालय
Kalyan Crime: केबिनमध्ये घुसून डॉक्टरला बेदम मारहाण, आधी कॉलर पकडली नंतर लाथाबुक्क्या मारल्या; कल्याण हादरले
... तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद! मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; शिंदें-फडणवीसांवर सर्वात गंभीर आरोप

पालघरमधील ताज्या घटनेचा उल्लेख

महाराष्ट्रात डॉक्टरांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पालघरमध्ये नुकत्याच घडलेल्या एका डॉक्टर हल्ल्याच्या घटनेचाही विशेष उल्लेख केला. सोशल आणि प्रिंट मीडियात आलेल्या बातम्यांचा हवाला देत, एकाच मानसिकतेचे लोक वारंवार डॉक्टरांवर हल्ले करत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com