Sunil Raut: पाप अंगाला चिकटेल म्हणून मी महाकुंभ मेळ्यात पाण्यात डुबकी मारली नाही; राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

Sunil Raut on Mahakumbh Mela: प्रयागराजमधील गंगा नदीतील पाण्यातील पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून मी पाण्यात डुबकी मारलीच नाही, आमदार सुनिल राऊतांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता.
Sunil Raut
Sunil RautSaam Tv News
Published On

प्रयागराजमध्ये भरवण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात गंगा नदीतील पवित्र स्नानाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद उफाळण्याची चिन्हे आहेत. प्रयागराजमधील गंगा नदीतील पाण्यातील पाप माझ्या अंगाला चिकटतील म्हणून मी पाण्यात डुबकी मारली नाही, असं आमदार सुनिल राऊत म्हणाले.

प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात दिग्गज नेते मंडळींसह सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. तसेच लाखोंच्या घरात सामान्यांनी हजेरी लावत गंगा नदीत स्नान केलं आहे. बरेच जण गंगा नदीत जातात स्नान करतात, महाकुंभ मेळ्यातील फोटो सोशल माध्यमांमध्ये शेअर करतात. सध्या आमदार सुनिल राऊत यांनी प्रयागराजमधील पवित्र स्नानाबाबत केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Sunil Raut
Crime News: बायको माहेरी गेली, नवऱ्याचा पारा चढला, पेट्रोल टाकून स्वत:ला लावली आग

मुंबईतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी एक विधान केलं होतं. सुनिल राऊत म्हणाले, 'मी महाकुंभ मेळ्यात सहभाग होण्यासाठी प्रयागराजला गेलो होतो. आजच महाकुंभ मेळ्यातून मुंबईत घरी परतलो. मुंबईत परतल्यानंतर लोक माझे पाया पडत होते.

Sunil Raut
Crime News: धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलं बाळ, भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे तोडले लचके

मी दोन दिवस प्रयागराजची मजा घेत होतो. कुणी किती पाप धुतली ते पाहत होतो. पाप धूतलेली बघता बघता ही पाप माझ्याच अंगाला चिकटतील की काय म्हणून मी पाण्यात डुबकी मारलीच नाही, असं वक्तव्य सुनिल राऊत यांनी केलं आहे. या वक्ताव्यावर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

विक्रोळी कन्नमवारनगरमधील शिवसेना ठाकरे गटाचा मिसळ महोत्सव या कार्यक्रमात आमदार सुनिल राऊत यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी हे विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com