'दादांच्या अपघाताबाबत माझ्याही मनात शंका', बारामतीकरांसमोर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य

Baramati Bypoll: बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेवेळी सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच दादांच्या अपघाताबद्दल शंका उपस्थित केलीय.. सुनेत्रा पवारांनी नेमकं काय म्हटलंय... आणि सुनेत्रा पवारांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलंय..
Sunetra Pawar addresses Baramati rally, raises doubts over Ajit Pawar’s accident and demands investigation.
Sunetra Pawar addresses Baramati rally, raises doubts over Ajit Pawar’s accident and demands investigation.saam tv
Published On

बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवारांनी दादांच्या अपघाताच्या मुद्द्यावर मौन सोडलंय...अजित पवारांच्या अपघाताबद्दल आपल्याला शंका असून त्यामागचं सत्य शोधण्याची मागणीच सुनेत्रा पवारांनी केलीय..अजित पवारांच्या अपघाती मृत्युला तीन महिने उलटून गेल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांनी जाहीरपणे ही मागणी केली. या प्रचार सांगता सभेला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दादांच्या अपघातामागचं सत्य शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याच स्पष्ट केलं...

खरं तर अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ अजुनही कायम आहे..... आतापर्यंत रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून व्हीएसआर कंपनीवर आरोप करत घातपाताचा संशय व्यक्त केला... एवढंच नाही तर डीजीसीएनं व्हीएसआर कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक चुका असल्याचा अहवाल दिल्यानंतर व्हीएसआरविरोधात एफआयआर करण्याची मागणी केली... मात्र राज्यात एफआयआर काही दाखल झालेली नाही. उलट कर्नाटक राज्यात झिरो एफआयआर दाखल कऱण्यात आली...

त्यानंतर पोटनिवडणुकीतही दादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा मुद्दा गाजला... सध्या अपक्ष असलेले उमेदवार हाच मुद्दा उपस्थित करत आहेत.. याच दरम्यान आता सुनेत्रा पवारांनीच दादांच्या अपघाताबद्दल संशय व्यक्त करत दोषींवर कारवाईची मागणी केलीय... त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री व्हीएसआर विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देणार का? आणि दादांच्या अपघाताचा सखोल तपास करुन दोषींवर कारवाई केली जाणार का? याचीच उत्सुकता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com