Disha Salian Death: ‘दिशा सालियानच्या बदनामी प्रकरणी अहवाल सादर करा! पोलिसांना दिले आदेश

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
Disha Salian Death: ‘दिशा सालियानच्या बदनामी प्रकरणी अहवाल सादर करा! पोलिसांना दिले आदेश
Disha Salian Death: ‘दिशा सालियानच्या बदनामी प्रकरणी अहवाल सादर करा! पोलिसांना दिले आदेशSaam TV
Published On

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद दरम्यान दिशा सालियान (Disha Salian) विषयी बदनामीकारक वक्तव्य (Statement) केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी महापौर (Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पोलिसांना (police) ४८ तासामध्ये अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे राणेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. (Submit report on Disha Salian defamation case)

हे देखील पहा-

सुशांत सिंहची (Sushant Singh) माजी व्यवस्थापक दिशा सालियनची हत्या झाली असून, हत्येच्या (killing) तिच्यावर बलात्कार (sexual assualt) झाल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. मात्र, हा आरोप पूर्णत: चुकीचा असून, एका महिलेची बदनामी करणारा आहे. यामुळे यासंदर्भात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली होती.

Disha Salian Death: ‘दिशा सालियानच्या बदनामी प्रकरणी अहवाल सादर करा! पोलिसांना दिले आदेश
Crime: माजी नगरसेविकेवर गोळीबार; Youtube वर पाहून त्याने बनवला घरीच कट्टा, पाेलिसांची माहिती

त्याची दखल घेत अध्यक्षा चाकणकर यांनी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ४८ तासामध्ये अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. स्वत: चाकणकर यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

Edited by- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com