Kalyan Subhash Maidan: "मैदानाचा बळी घेतला तर अधिकार्‍यांचा बळी घेऊ!" कल्याणच्या सुभाष मैदानावर मनसेचा केडीएमसीला थेट इशारा

MNS protests in Kalyan Subhash ground: इनडोअर खेळासाठी केडीएमसीनं सुभाष मैदानावर खोदकाम सुरू केलंय. त्यामुळे मैदानाची जागा कमी होणार असल्यानं क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय.
Kalyan Subhash Maidaan
Kalyan Subhash MaidaanSaam Tv News
Published On

अभिजित देशमुख, साम टीव्ही

कल्याणमधील क्रिकेट खेळाडूसाठी प्रसिद्ध असलेले सुभाष मैदान वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. इनडोअर खेळासाठी केडीएमसीनं या मैदानावर खोदकाम सुरू केलंय. त्यामुळे मैदानाची जागा कमी होणार असल्यानं क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. क्रिकेट प्रेमींसह मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी मैदानावर जाऊन गोंधळ घातला. तसेच काम बंद पाडले.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम होऊ देणार नाही. मैदानाचा बळी घेतला तर आम्ही अधिकार्‍यांचा बळी घेऊ, असा सज्जड दम केडीएमसी प्रशासनाला दिलाय. तर याबाबत केडीएमसीने सावध पवित्रा घेत तूर्तास काम थांबवले आहे. तसेच नागरीकांसोबत चर्चा करुन पुढील प्रक्रिया सुरू असेही त्यांनी सांगितले.

Kalyan Subhash Maidaan
SIP investment benefits: २००० रुपयांची SIP करा आणि करोडपती व्हा; जाणून घ्या श्रीमंतीचा फॉर्म्युला, फक्त एका क्लिकवर

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मैदानाची कमतरता आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिका हद्दीतील मैदाने, लग्न, राजकीय कार्यक्रम, विविध समारंभ या कार्यक्रमांसाठी भाड्यानं देण्यात येत आहे. ज्यामुळे खेळाडूंचा हिरमोड होतोय. बहुतांश कल्याणकर सुभाष मैदानावर क्रिकेटचे धडे गिरवतात. मात्र, सुभाष मैदानावर खेलो इंडिया या उपक्रमांतर्गत इनडोअर खेळाकरीता खोदकाम सुरूय. ज्यामुळे खेळाडूंचा हिरमोड झालाय.

Kalyan Subhash Maidaan
Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, 'त्या' विधानावरून एफआयआर दाखल, अटक होणार?

या खोदकामाची माहिती मिळताच क्रीडा प्रेमी आणि मनसेनं धाव घेतली. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर मैदानावर दाखल होत, खोदकामाला तीव्र विरोध केला. त्यानंतर त्याठिकाणी केडीएमसीची अधिकारी पोहोचले. अधिकार्‍यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र क्रिडीप्रेमी आणि मनसे काही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेरीस अधिकार्‍यांना माघार घ्यावी लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com