Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना महिला आयोगाची नोटीस; 'ते' वक्तव्य भोवणार?

राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली आहे.
Sambhaji Bhide
Sambhaji BhideSaam TV
Published On

मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे संभाजी भिडे पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले भिडे (Sambhaji bhide) यांनी साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 'तू टिकली लाव, मग मी तुझ्याशी बोलेन', असे अजब विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. (Sambhaji Bhide News Today)

Sambhaji Bhide
Andheri By-Election: बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

राज्यमहिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संभाजी भिडे यांना नोटीस धाडली आहे. 'महिला पत्रकाराला तु टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी आज केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा', असं महिला आयोगानं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

संभाजी भिडे काय म्हणाले होते?

संभाजी भिडे हे बुधवारी (2 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते. यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना थांबवले. यावेळी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य करत काढता पाय घेतला.

'आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो', असं अजब वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौहेबाजूंनी टीका होत आहे. त्यातच आता त्यांना राज्य महिला आयोगाने सुद्धा नोटीस पाठवली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com