एसटी कर्मचाऱ्यांनो जीव देऊ नका भाजप तुमच्या पाठिशी; सदाभाऊ खोत यांची विनंती

ऊसाच्या एफआरपी'च्या संदर्भात राज्यसकारने 30 तारखेला मंत्रालयात बैठक ठेवली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व शेतकरी संघटनांना आमंत्रण दिले असल्याचे ते म्हणाले.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSaam Tv
Published On

मुंबई: राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या आंदोलनात कर्मचारी आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. अजुनही राज्यात एसटी (ST) कर्मचाऱ्यांचं आत्महत्येच सत्र थांबलेलं नाही, आज शहापूर मधील एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. यावर आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याची विनंती केली आहे. 'राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो कोणीही जीव देऊ नका भाजप (BJP) तुमच्या पाठिशी असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

एसटी (ST) कर्मचाऱ्यांनो भाजप तुमच्या पाठिशी आहे. कोणीही चिंता करु नका, मुला बाळांना उघड्यावर आणू नका असही सदाभाऊ खोत म्हणाले. ऊसाच्या एफआरपी' (FRP) च्या संदर्भात राज्यसकारने 30 तारखेला मंत्रालयात बैठक ठेवली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व शेतकरी (Farmer) संघटनांना आमंत्रण दिले असल्याचे ते म्हणाले.

Sadabhau Khot
MSRTC: परिवहन मंत्री अनिल परबांवर गुन्हा दाखल करा : एसटी कर्मचारी

राज्यातील एसटी (ST) कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. पण अजुनही काही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.

Edited By - Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com