SSC Exam 2023 : दहावीचा गणिताचा पेपर पुण्यात फुटला ? बिबवेवाडी पोलिस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल

या प्रकरणाचा पाेलिस तपास करीत आहेत.
SSC Exam, Maths Paper, Students, Parents, Teachers, Police
SSC Exam, Maths Paper, Students, Parents, Teachers, Policesaam tv
Published On

- सचिन जाधव

Pune News : दहावीच्या परीक्षा (ssc exam 2023) केंद्रावर परवानगी नसतानाही हॉलमधील फोटो काढल्याने तसेच गणित भाग एकचा पेपरचे छायाचित्र महिला सुरक्षा रक्षकाच्या माेबाईलमध्ये आढळल्याने दाखल तक्रारीनंतर बिबवेवाडी पोलिसांनी (bibwewadi police) महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात (yashwantrao chavan madhyamik vidyalaya bibwewadi) हा प्रकार घडला हाेता.

SSC Exam, Maths Paper, Students, Parents, Teachers, Police
SSC Exam : दहावीचा पेपर सुरु असताना केंद्रावर जमावाची दगडफेक; भरारी पथकातील अधिकारी जखमी, अभियंता गंभीर

याबाबत मिळालेली माहिती अशी - १३ मार्चला (ssc) गणित भाग एकचा पेपर होता. यावेळी विद्यालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. कांबळे यांच्या या कृतीमुळे पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

SSC Exam, Maths Paper, Students, Parents, Teachers, Police
Bribe : दारू-मटणसाठी लाच घेतल्याप्रकरणी प्राचार्यावर गुन्हा दाखल

दरम्यान १५ मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले हाेते. यावेळी या पथकास महिला सुरक्षा रक्षकाचा संशय आला. तिच्याकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आला. त्याची झाडाझडती घेतली असता गणित भाग एकच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो माेबाईलमध्ये काढल्याचे समोर आले.

यावेळी पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली. मात्र तिने उडवाउडविची उत्तर दिले. त्यामुळे अखेर पथकाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी किसन भुजबळ यांच्या तक्रारीनूसार मनिषा कांबळे या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com