SRA कार्यालयात ऑनलाइन प्रवेशाचा खोळंबा; ओटीपीसाठी नागरिकांची प्रतीक्षा

SRA office Bandra East Online Entry OTP Delay: वांद्रे पूर्व येथील एसआरए कार्यालयात ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान नेटवर्कच्या समस्येमुळे ओटीपी मिळण्यास विलंब होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
SRA office Bandra East online entry OTP delay
SRA office Bandra East online entry OTP delaysaam tv
Published On: 

संजय गडदे, साम टीव्ही

बांद्रे पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. कार्यालयात प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आणि ओटीपीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र, कमी नेटवर्कमुळे ओटीपीचा संदेश येण्यास विलंब होत असल्याने नागरिकांना प्रवेशद्वारावर बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे.

SRA office Bandra East online entry OTP delay
Sachin Ahir: मोठी बातमी! सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती, एकमताने झाली बिनविरोध निवड

एसआरए कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येतात. कार्यालयात प्रवेश देण्यापूर्वी प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून टॅबच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे नाव आणि मोबाइल क्रमांक नोंदवला जातो. ही माहिती सबमिट केल्यानंतर नागरिकांच्या मोबाइलवर ओटीपी पाठवला जातो. ओटीपी सांगितल्यानंतर प्रवेश अधिकृत होतो आणि नागरिकांना कार्यालयात जाता येते.

SRA office Bandra East online entry OTP delay
Pradip Purnekar: मोठी कारवाई! पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आणखी दोघांना अटक, प्रसिद्ध बिल्डरला चौकशीसाठी बोलावलं

ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात असली, तरी ए विंगच्या प्रवेशद्वारावर अनेकदा नेटवर्कची समस्या निर्माण होते. त्यामुळे ओटीपीचा संदेश वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. ओटीपी येण्याची प्रतीक्षा करताना नागरिकांना उन्हात उभे राहावे लागते. परिणामी, प्रवेशद्वारावर गर्दी होते आणि नागरिकांचा वेळही वाया जातो.

SRA office Bandra East online entry OTP delay
Pradip Purnekar: मोठी कारवाई! पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्या आणखी दोघांना अटक, प्रसिद्ध बिल्डरला चौकशीसाठी बोलावलं

ऑनलाइन प्रवेश व्यवस्था नागरिकांची माहिती नोंदवण्यासाठी उपयुक्त असली, तरी नेटवर्कच्या समस्येमुळे तिच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत असल्याचे दिसते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक जलद आणि सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत एसआरएकडे विचारणा केली असता, सर्व प्रवेशद्वारांवरील प्रवेश यंत्रणा सुरळीत सुरू असून नागरिकांना ओटीपीचे संदेश व्यवस्थित मिळत असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com