

Mumbai News : रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर येत्या शनिवारी रविवारी म्हणजे 12 आणि 13 ऑगस्ट रोजी मध्यरात्री विशेष ब्लॉक असणार आहे. 4 फूट ओव्हर ब्रिज गर्डर्स लाँच करण्यासाठी ठाणे-कोपरखैरणे ट्रान्स-हार्बर सेक्शनवर ठाणे स्टेशनच्या सीएसएमटी टोकावर पॉवर ब्लॉक असणार आहे.
क्रेन वापरून ठाणे स्टेशनच्या सीएसएमटी टोकावर 5 मीटर रुंद FOB गर्डर्स लाँच करण्यासाठी रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.
ब्लॉकची तारीख, वेळ आणि कालावधी:
शनिवारी रात्री 11.50 ते रविवार पहाटे 04.50 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर उपनगरीय सेवा रद्द राहतील. ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ठाणे - पनवेल लोकल ठाण्याहून रात्री 11.32 वाजता सुटेल. (Latest Marathi News)
ठाण्याला जाण्यासाठी ब्लॉक करण्यापूर्वी शेवटची लोकल - ठाणे लोकल पनवेलहून रात्री 10.45 वाजता सुटेल. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.