KDMC News: कल्याण डोंबिवलीत पार्किंगचा प्रश्न उद्भवणार, कारण? वास्तू विशारदांच्या आरोपानंतर पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

kalyan dombivli parking News : पालिकेच्या नगररचना विभागाकडून इमारतीना नियमांचे उल्लंघन करत परवानगी देत शहराच्या विद्रूपीकरणात भर टाकत आहे, असा आरोप वास्तू विशारद संदीप पाटील यांनी केला आहे
KDMC News:
KDMC News:Saam tv
Published On

Kalyan Dombivli News: कल्याण डोंबिवली शहरात झपाट्याने लोकवस्ती वाढत असतानाच वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे भविष्यात वाहनाच्या पार्किंगची भीषण समस्या निर्माण होणार आहे. मात्र तरीही पालिकेच्या नगररचना विभागाकडून इमारतीना नियमांचे उल्लंघन करत परवानगी देत शहराच्या विद्रूपीकरणात भर टाकत आहे, असा आरोप वास्तू विशारद संदीप पाटील यांनी केला आहे. (Latest Marathi News)

नगररचना विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे भविष्यात पालिका क्षेत्रात पार्किंगची भीषण समस्या निर्माण होणार आहे, असाही आरोप करत पाटील यांनी आयुक्ताकडे तक्रार केली आहे.

KDMC News:
Aditi Tatkare News: राज्यात पाळणाघर योजनेची अंमलबजावणी कधी होणार? मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

वास्तू विशारद संदीप पाटील यांचा नेमका आरोप काय?

वास्तू विशारद संदीप पाटील कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागावर गंभीर आरोप केले आहेत. 'कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अधिकृत इमारती उभारण्यासाठी विकासकांना शासनाच्या नियमांचे पालन करत वास्तु विशारदानी तयार केलेला विकास आराखडा पालिकेला सादर करावा लागतो. मात्र अनेक विकासक अधिकृत वास्तु विशारदाची मदत घेण्याऐवजी सहाय्यकांची मदत घेत इमारतीचा नकाशा तयार करत इमारतीचा प्लान नगरविकास विभागाकडून मंजूर करून घेतात, असे संदीप पाटील म्हणाले. (Kalyan Latest News)

'इमारतीबाहेर ६ मीटरची मोकळी जागा सोडणे बंधनकारक आहे, मात्र केवळ ३ मीटर किंवा त्याहून कमी जागा सोडून इमारत उभारली जाते. इमारतीत राहणाऱ्या लोकांना गाड्या उभ्या करण्यासाठी देखील विकासक जागा सोडत नाहीत. यामुळे केवळ पार्किंगची समस्या निर्माण होणार नाही तर एखाद्या इमारतीला आग लागल्यास अग्निशमनच्या वाहनांना प्रवेश करणे देखील शक्य होणार नाही. यामुळे मनुष्यहानी आणि वित्तहानी होण्याची देखील भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

KDMC News:
PM Modi On Avishwas Prastav: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधक आक्रमक, सभागृहात 'मणिपूर.. मणिपूर...'च्या घोषणा

तत्पूर्वी, याची संपूर्ण कल्पना असतानाही नगररचना विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत त्रुटी असलेल्या नकाशाच्या आधारे बांधकाम परवानगी देत शहराच्या विद्रूपी करणात भर टाकण्या बरोबरच नागरिकाच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या प्ररकणी महापालिका आयुक्ताना तक्रार करत चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी आयुक्ताकडे तक्रार करत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com