Abdul Sattar News : पन्नास खोके एकदम ओके; अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, कुठं घडला प्रकार? VIDEO

Abdul Sattar latest News : अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. बाजार समित्यांच्या परिषदेत हा प्रकार घडला.
पन्नास खोके एकदम ओके; अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, कुठं घडला प्रकार?
Abdul SattarSaam TV
Published On

पिंपरी-चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व आजी आमदारांनी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. तर निवडणुकीमुळे विरोधकही सक्रिय झाले आहेत. अशाच दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तारांना भर कार्यक्रमात घोषणाबाजीचा सामना करावा लागला. पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणाबाजीचा अब्दुल सत्तारांना सामना करावा लागला. बाजार समित्यांच्या परिषदेत घोषणाबाजी ऐकू आल्याने अब्दुल सत्तारांनी कार्यक्रमाच्या ठिकाणावरून काढता पाय घेतला.

पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात राज्यस्तरीय बाजार समित्यांची परिषद सुरु होती. या परिषदेला पणन मंत्री अब्दुल सत्तारांनी हजेरी लावली होती. मात्र, या परिषदेत अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या परिषदेला राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती आणि सचिव यांनी अब्दुल सत्तारांचे करायचे काय, खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या.

पन्नास खोके एकदम ओके; अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, कुठं घडला प्रकार?
Crime News : आधी शरीरसंबंध ठेवले, नंतर चिरला बायकोचा गळा; तरुणाच्या कृत्याने अख्खं शहर हादरलं

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजाविषयी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची आकुर्डीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले होते.

पन्नास खोके एकदम ओके; अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, कुठं घडला प्रकार?
MTHL Bridge : अटल सागरी सेतूवर बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका, समोर आलेल्या VIDEOने चिंता वाढवली

कृषीपणन मंत्री अब्दुल सत्तार नियोजीत कार्यक्रमाला दीड तास उशिरा पोहचले. तेथे आल्यानंतर केवळ एकच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. वाद निर्माण होईल, असे वक्तव्य करु नका. मला राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीला जायचे, असे म्हणून परिषदेतून सत्तारांनी काढता पाय घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com