Viral VIdeo
Viral VIdeoSaam TV

Snake Viral Video: बाप रे बाप, शाळेच्या वर्गात घुसला साप! विद्यार्थ्यांसह शिक्षकांची उडाली तारांबळ, पाहा व्हिडीओ

Kalyan News: कल्याण पश्चिमेतील शशांक विद्यालयात ही घटना घडली आहे.
Published on

अभिजीत देशमुख

Viral Video : शाळेच्या वर्गात साप आढळून आल्याने विद्यार्थी शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाल्याची घटना आज कल्याणमध्ये घडली. साप शाळेत शिरल्याची माहिती सर्पमित्रांना मिळतात सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत सापाला पकडलं. त्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.

कल्याण पश्चिमेतील शशांक विद्यालयात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शाळा सुरू झाली. विद्यार्थी वर्गात बसले असताना एका बेंचखाली साप असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. शिक्षकांनी तत्काळ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. (Viral Video)

Viral VIdeo
Badlapur Major Accident : मुलीला १०वीच्या परीक्षेला सोडायला चाललं होतं दाम्पत्य; कारनं उडवले; बाईकचे २ तुकडेच पडले

पुस्तके आणि बॅग सोडूनच विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह वर्गाबाहेर धाव घेतली. याबाबत सर्पमित्रांना माहिती देण्यात आली सर्पमित्र दत्ता बोम्बे यांनी घटनास्थळी धाव घेत बेंचखाली लपलेल्या सापाला पकडलं. यानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा जीवातजीव आला. हा साप बिनविषारी धामण जातीचा असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याचे बोंबे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com