अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
Sinhagad Road flyover inauguration : पुण्यातील बहुप्रतिक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरदरम्यान सुमारे २१०० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलामुळे सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीतून पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोहळ्यास खासदार मेधा कुलकर्णी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अजित पवार यांनी उड्डाणपुलाच्या कामाची सविस्तर माहिती घेत प्रशासनाचे कौतुक केले. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची गैरसोय दूर होऊन पुण्याच्या पायाभूत विकासाला चालना मिळेल, असे पवार यांनी सांगितले.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील वाहतूक कोंडीचे सोमवारी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. उड्डाणपूल तयार असून सुद्धा त्याचे उद्घाटन का केलं गेलं जात नाही असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले.
महाराष्ट्राच्या ६६व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना शुभेच्छा देत कामगार दिनाचेही अभिनंदन केले. सिंहगड रोडवरील २१०० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करताना त्यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणाऱ्यांचे कौतुक केले. हा पूल नागरिकांचा अर्धा तास वाचवेल, असे ते म्हणाले.
पुरंदर विमानतळाबाबत आंदोलनांना उत्तर देताना पुनर्वसनाशिवाय प्रगती अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाणेर येथील ३५० कोटींचा प्रकल्प वेळेअभावी उद्घाटनास विलंब झाल्याचे सांगितले. पुण्यात दोन रिंग रोड, शिक्षण सुधारणा, आणि ७ लाख कोटींच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला झुकते माप देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमधील विकृती मोडण्याचे काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. पुढील पाच वर्षांत पुणे विकासाला गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.