श्रीकांत शिंदेंचे विश्वासू अनमोल म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला
कल्याणमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी
Anmol Mhatre Joins BJP Ahead of KDMC Elections : निवडणुकीच्या तोंडावरच श्रीकांत शिंदे यांना होमपिचवर मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवलीमधील श्रीकांत शिंदेंच्या विश्वासू नेत्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. डोंबिवलीतील दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मुलाने आणि सूनेने आज भाजपमध्ये प्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सकाळी पक्ष प्रवेश झाला. यावेळी कल्याण-डोंबिवलीमधील अनेक शिवसैनिकांनी भाजपचे कमळ हातात घेतली. या पक्ष प्रवेश सोहळ्याला रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय अनेक स्थानिक भाजप नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकीआधी हा शिंदेंना सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले दिसत आहे. त्यातच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रमूख भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसेनेचे युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. अनमोल म्हात्रे हे केडीएमसीतील माजी दिग्गज नगरसेवक अशी ओळख असलेल्या दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत. अनमोल म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीने आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हातात घेतले.
काही दिवसात राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याआधी भाजपकडून जोरदार तयारी कऱण्यात येत आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अनमोल म्हात्रे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. म्हात्रे यांच्यामुळे भाजपची कल्याणमधील ताकद आणखी वाढली आहे. जानेवारी २०२६ च्या आधी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडे भाजपकडून विशेष लक्ष देण्यात आले आहे. ऑपरेशन लोटस अंतर्गत आता शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय धुरळा आणि धामधूम दिसून येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, मनसे अशा प्रमूख पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी दस्तुरखुद्द भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत महापालिका निवडणुकीतील आपली जागा अबाधित ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. डोंबिवलीतील शिवसेनेतील (शिंदे गट) अनमोल म्हात्रे यांनी सपत्नीक आणि अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की दिवंगत वामन म्हात्रे यांचे आणि आपले जुने ऋणानुबंध होते. या शहराला एक वेगळी पारदर्शकता आणायची असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ही गोष्ट अशक्य नाही असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.