Crime news
Crime newsSaam tv

घरामागे खरकटं अन्न टाकल्यानं आला राग, महिलेची वृद्ध दाम्पत्याला मारहाण

मांगरूळ गावातील धक्कादायक प्रकार
Published on

अंबरनाथ: एका वृद्ध दाम्पत्याला महिलेने जमिनीवर पाडून मारहाण केल्याची घटना अंबरनाथ (Ambernath)तालुक्यातील मांगरूळ गावात (village) घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस (Police) ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा-

अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळ गावात ७५ वर्षांचे जयराम पाटील आणि त्यांच्या ७० वर्षांच्या पत्नी विठाबाई हे दाम्पत्य वास्तव्याला आहे. शुक्रवारी २२ एप्रिल दिवशी सकाळी विठाबाई या त्यांच्या घराच्या मागे चक्कर मारण्यासाठी गेल्या असता, तिथे कुणीतरी खरकटं अन्न आणून टाकल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्या महिलेकडे विचारणा केली असता या महिलेची मुलगी मालू फुलोरे हिने तिथे येऊन वृद्ध जयराम पाटील यांना धक्का देऊन खाली पाडलं, तर विठाबाई यांना सुद्धा खाली पाडून त्यांच्या पायावर लाथ घातली.

Crime news
लखीमपूर खेरी प्रकरण; आशिष मिश्रांवरील आरोपांवर आज सुनावणी

यावेळी विठाबाई यांच्या पुतण्याने मध्ये पडत त्यांची सुटका केली आणि तातडीने त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले होते. या मारहाणीमुळे विठाबाई यांच्या मांडीचं हाड मोडलं असून, त्यांच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विठाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी मारहाण करणारी महिला मालू फुलरे हिच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com