वैद्यकीय चाचणीत कॅन्सर झाल्याचं समजलं; कंपनीनं कर्मचाऱ्याला थेट कामावरुन काढलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

Pune Tech Company Firing Cancer-Affected Employee: पुण्यातील एका आयटी कंपनीनं एका कॅन्सरग्रस्त कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलंय. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर कामावरून काढून टाकण्यात आले. आता त्या कर्मचाऱ्याने न्यायाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.
Pune Tech Company Firing Cancer-Affected Employee:
Terminated IT employee sitting on hunger strike outside the company office in Pune after being diagnosed with cancer.saam tv
Published On
Summary
  • पुण्यातील प्रसिद्ध आयटी कंपनीत संतापजनक प्रकार घडलाय.

  • कॅन्सरचे निदान झाल्यानंतर कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याचा आरोप कर्मचाऱ्यानं केलाय.

  • उपचारासाठी घेतलेल्या सुट्ट्यांचा दिला गेला फटका.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

कर्मचाऱ्याला कॅन्सर झाल्याचे समजताच कंपनीने वेगवेगळी कारणे देत त्या कर्माचाऱ्याला कामावर काढून टाकलं. हा संतापजनक प्रकार घडलाय, पुण्यातील एका प्रसिद्ध आयटी कंपनीत. कंपनीने कामावरून कमी केल्यानंतर आयटी कर्मचारी सोमवारपासून कंपनी कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहे.

Pune Tech Company Firing Cancer-Affected Employee:
Body Lump Symptoms: शरीरावरील गाठींमधील वेगळेपण कसं ओळखावं? डॉक्टरांनी सोप्या शब्दात सांगितलं

कर्करोगाच्या उपचारावेळी घेतलेल्या सुट्ट्यांमुळे कामाहून कमी केल्याचा आरोप करीत पुण्यातील एक आयटी कर्मचारी सोमवारपासून कंपनी कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहे. कॅन्सरग्रस्त कर्मचारी गेल्या ८ वर्षांपासून एका फ्रेंच कंपनीत कामाला होता. यावर्षी झालेल्या एका वैद्यकीय चाचणीत त्यांना घशाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांनी कर्करोगाच्या उपचारासाठी काही महिने सुटी घेतली. सुट्टीहून माघारी आल्यानंतर त्यांना कंपनीने खोटी कारणे देत कामाहून कमी केले, असा कर्मचाऱ्यानं आरोप केलाय.

Pune Tech Company Firing Cancer-Affected Employee:
पुणे शहर पोलीस दलात मेगा भरती, २००० पदांसाठी २ लाखांहून अधिक अर्ज; प्रक्रिया कधी सुरु होणार?

सदर कर्मचारी २०१७मध्ये या कंपनीत फॅसिलिटी मॅनेजर या पदावर रुजू झाले. एप्रिल महिन्यात झालेल्या वार्षिक आरोग्य तपासणीवेळी त्यांना घशाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी या कर्करोगावर जूनमध्ये उपचार केले, ते कर्करोगासाठी अद्यापही उपचार घेत आहेत. तर जुलैमध्ये ते पुन्हा कामावर रुजू झाले. तर २७ जुलै रोजी त्यांना कामाहून कमी करण्यात आले. काही आर्थिक व्यवहारादरम्यान प्रक्रिया न पाळल्यामुळे कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे त्यांना कामाहून कमी करण्यात आले असल्याचे कंपनीने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. मात्र, सदर व्यवहार त्यांनी केलेले नसल्याचे पाटोळे सांगतात.

कंपनीच्या अहवालानुसार गेल्या तीन वर्षांत त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती. जर माझी कामगिरी उत्तम असेल तर मी केलेले व्यवहार तोट्यात कसे असू शकतात? असा प्रश्‍न उपस्थित करीत त्यांच्यावर झालेले आरोप आधारहीन असल्याचे पीडित कर्मचाऱ्यानं सांगितले.

या बेकायदेशीर हकालपट्टीमुळे त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर, करिअरवर, कुटुंबावर वाईट परिणाम झाला आहे. सुरुवातीला ते त्यांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्याची मागणी करीत होते. मात्र, आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.त्यामुळे कंपनीने त्यांना झालेल्या दुष्परिणामाची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com