

शरीरावर गाठ आल्यामुळे अनेकांना भीती वाटते की, ती कॅन्सरची तर नाही ना? पण प्रत्येक गाठ म्हणजे कॅन्सरच असते असे नाही. साधी गाठ आणि कर्करोगाची गाठ यातील फरक ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. कारण चुकीची भीती किंवा चुकीचा अंदाज यामुळे उपचारांना उशीर होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, शरीरात निर्माण होणाऱ्या सर्वसाधारण गाठी आणि कॅन्सरच्या गाठी या दोन्ही वेगळ्या असतात, पण दोन्हींच्या लक्षणांमुळे अनेकदा गोंधळ उडू शकतो. काही वेळा आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींनीही रुग्णांच्या भीतीत भर घालणारी माहिती दिल्याचे उदाहरणे आढळतात. त्यामुळे योग्य उपचारासाठी गाठींचे प्रकार आणि त्यांचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे.
गाठ म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागावर दिसणारी असामान्य सूज. जसं की एखाद्या फोडी प्रमाणे शरीराच्या आतल्या बाजूने वाढलेली गाठ असते. चरबी, स्नायू, हाडे, नसा, किंवा ग्रंथी यामध्ये गाठ निर्माण होऊ शकते. मात्र प्रत्येक गाठ धोकादायक नसते. त्वचेखाली फॅट साठल्यामुळे होणाऱ्या लिपोमा किंवा रक्तवाहिन्यांच्या वाढीमुळे तयार होणाऱ्या गाठी या Harmless असतात आणि त्यांना उपचारांचीही गरज नसते.
काही गाठी सौम्य असल्या तरी त्यांच्या ठिकाणामुळे अस्वस्थता किंवा वेदना होऊ शकतात. तर दुसरीकडे, जेव्हा शरीरातील पेशींमध्ये आनुवंशिक बदल होतात, तेव्हा कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते. कॅन्सरच्या गाठी वाढीचा वेग, आकारातील बदल, वेदना, त्वचेचा रंग बदलणे किंवा आसपासच्या ऊतींवर दाब निर्माण करणे अशी लक्षणे तुम्हाला जाणवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, गाठीची जागा, आकार, स्पर्श केल्यावर जाणवणारी कडकपणा किंवा वेदना, वाढण्याचा वेग या बाबींवरून डॉक्टर अंदाज लावू शकतात. पण अंतिम उपचारासाठी तपासण्या आवश्यक असतात. त्यामुळे शरीरावर कोणतीही नवीन, वाढणारी किंवा वेदनादायक गाठ दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणेच योग्य ठरते. योग्य माहिती आणि योग्य वेळी केलेले उपचार यामुळे भीती कमी होते आणि उपचार जास्त प्रभावीपणे करता येतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.