सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची, घरात बॉयफ्रेंडला बोलावून संबंध ठेवायची; पुण्यातील बिझनेसमॅनच्या सूनेचा कारनामा

Daughter-in-law’s Illicit Affair and Sleeping Pill Conspiracy Exposed: पुण्यातील व्यापारी कुटुंबातील लहान सुनेचा प्रताप. बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवण्यासाठी सासू सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या द्यायची.
Daughter-in-law’s Illicit Affair and Sleeping Pill Conspiracy Exposed
Daughter-in-law’s Illicit Affair and Sleeping Pill Conspiracy ExposedSaam Tv
Published On

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील सुनेचा प्रताप समोर आला आहे. लहान सून आपल्या सासू सासऱ्याला झोपेच्या गोळ्या द्यायची. तसेच प्रियकरासोबत दिवसा घरात त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवायची. यानंतर सासू सासऱ्यांना झोपेबाबत संशय वाटू लागला. कुटुंबाने डिटेक्टिव्ह प्रिया काकडेला याबाबत माहिती दिली. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.

ज्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला, ते संबंधित कुटुंब शहरातील नामांकित व्यापारी आहेत. वृद्ध दांपत्य यांना दोन मुलं आणि दोन सुना असे परिवार आहे. काही महिन्यांपासून वृद्ध दांपत्याला वारंवार झोपेचा त्रास जाणवत होता. त्यांनी याबाबत फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. मात्र, वैद्यकीय तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली.

Daughter-in-law’s Illicit Affair and Sleeping Pill Conspiracy Exposed
नेपाळमध्ये मोठी दुर्घटना; बर्फाचा भलामोठा पर्वत कोसळला; ७ गिर्यारोहकांचा जागीच मृत्यू

वृद्ध दांप्त्याच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं. डॉक्टरांनी मोठ्या सुनेची वैद्यकीय तपासणी केली. तिच्याही रिपोर्टमध्ये गोळ्यांचे अतिप्रमाण झाल्याचं आढळून आलं. मात्र, छोट्या सुनेच्या रिपोर्टमध्ये काहीही आढळलं नाही. कुटुंबियांचा संशय लहान सुनेवर गेला. कुटुंबियांनी सुप्रसिद्ध खासगी गुप्तहेर डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांना याबाबत माहिती दिली.

Daughter-in-law’s Illicit Affair and Sleeping Pill Conspiracy Exposed
गर्लफ्रेंडचं लग्न झालं, 24x7 लक्ष ठेवण्यासाठी बॉयफ्रेंडनं झुडुपात कॅमेरा बसवला, पतीनं पाहताच.. नेमकं घडलं काय?

प्रिया काकडे यांनी सूनेशी मैत्री करून तिच्याकडून पुरावे गोळा केले. काही दिवसांतच संपूर्ण प्रकरण समोर आलं. लहान सून वृद्ध दांप्त्याच्या नाष्त्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळायची. तसेच दिवसाढवळ्या घरात आपल्या प्रियकराला बोलावून घ्यायची. लहान मुलाच्या शारीरिक व्यंगामुळे त्यांचं लवकर लग्न जुळत नव्हतं. नंतर मुलीनं पसंत केलं. तिनं लग्न केलं. पण काही दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

लहान सूनेनं चूक कबुल केली. कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कुटुंबियांना लहान सुनेनं चोरलेले दागिने आणि पैसेही परत मिळाले. त्यानंतर मुलानं काडीमोड घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com