मुंबई: दिव्यातील नागवाडी परिसरात राहत असलेल्या दशरथ काकडे याने त्याच्या घराजवळ थुंकणाऱ्या रुपेश गोळे या १३ वर्षांच्या मुलाचा राग आल्यामुळे त्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी (police) आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी (Accused) दशरथ काकडे याने रुपेशच्या आईला खोटे सांगून त्याला परिसरातील बंद असलेल्या ठामपाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयामध्ये नेहून तेथे गळा दाबून त्याचा खून (killed) करण्यात आला आहे.
हे देखील पहा-
मयत मुलाचे वडील विजय यांनी याविषयी दाखल केलेल्या तक्रारीवरून काकडे याला पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. दिवा पश्चिम येथील नागवाडी भागात रुपेश हा वडील विजय आणि आईबरोबर राहत होता. त्याच्या शेजारी दशरथ हा राहत असून, तो रुपेशचा नातेवाईक देखील आहे. दिवा येथे सुरू असलेल्या गावदेवीच्या जत्रेला रुपेशला नेतो, असे विजय यांना खोटे सांगून दशरथ हा रुपेशला रविवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घेऊन गेला होता. सायंकाळी दशरथ घरी परतला. परंतु, त्याच्या बरोबर रुपेश नव्हता. यामुळे विजय यांनी दशरथला रुपेशविषयी विचारले असता, त्याने तो जत्रेत खेळत असल्याचे कारण सांगितले. रात्री उशिरापर्यंत रुपेश घरी न आल्याने विजय यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दशरथला ताब्यात घेतले. त्यावेळी आपण रुपेशला घेऊन गेल्यानंतर त्याला फेरीवाल्याकडून कपडे खरेदी करून दिले आणि त्यानंतर जत्रेत नेले, असे सांगितले. दिव्यात केवळ सायंकाळी बाजार भरतो. परंतु, दशरथने रुपेशला दुपारी नेले होते. यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. सोमवारी पोलीस त्याला बाजारात घेऊन गेले, हे कपडे खरेदी केले, याविषयी विचारले. यानंतर दशरथने एका फेरीवाल्याकडे नेले पण त्याने नकार दिला. दिवा येथील एका निर्जनस्थळी ठाणे महापालिकेचे एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहामध्ये कोणी देखील फिरकत नाही. या स्वच्छतागृहाच्या पहिल्या मजल्यावर दशरथ याने रुपेशला नेले. त्याठिकाणी त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. मृतदेह तिथेच सोडून दशरथ हा घरी आला होता. सोमवारी पोलिसांनी रुपेशचा मृतदेह स्वच्छतागृहातून बाहेर काढला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.