Badlapur News: भरधाव वेगानं येणाऱ्या कारचं नियंत्रण सुटलं, दुचाकीवरून येणाऱ्या तिघांना उडवलं, थरार सीसीटीव्हीत कैद

Brutal Accident on Wangani-Badlapur Road: भरधाव वेगानं येणाऱ्या एका कार चालकानं दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ३ जण गंभीर जखमी झालेत. तिघांवर रूग्णलयात उपचार सुरू.
badlapur
badlapurSaam
Published On

वांगणी बदलापूर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगानं येणाऱ्या एका कार चालकानं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याचा आरोप परिसरातील नागरीकांकडून होत आहे.

सोमवारी सकाळच्या सुमारास वांगणीतील गणेश घाटाजवळ कार चालक आणि दुचाकीचा भीषण अपघात घडला. दुचाकीवर बसून तीन जण बदलापूरच्या दिशेनं जात होते. त्याचवेळी बदलापूरच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे चारचाकी थेट दुचाकीला जाऊन धडकली.

badlapur
Sambhajinagar: कुटुंबासोबत जेवण केलं, घरी जाऊन आयुष्य संपवलं; २५ वर्षीय तरूणीनं घेतला टोकाचा निर्णय

या अपघातात सचिन म्हसे, ऋषिकेश झांजे, श्रीधर झांजे यांच्या हाता पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या अपघाताला ठेकेदाराचा निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे.

badlapur
Devendra fadnavis: 'देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होणार नाही' - मुख्यमंत्री फडणवीस

गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण-कर्जत राज्य महामार्गावरील वांगणी-बदलापूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी सिंगल लेन सुरू आहे. शिवाय डायव्हर्जनसाठी बॅरिकेटस लावल्याचे दिसून येत नाहीत. त्यामुळे कारचालकासोबत ठेकेदारावरही कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com