Pune News : पुण्यातील पीडित तरुणीवर दोनदा बलात्कार; मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Pune Latest News : पुण्यातील पीडित तरुणीवर दोनदा बलात्कार झाल्याचे मेडिकल रिपोर्टमधून समोर आले आहे. मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
pune
Pune News Saam tv
Published On

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमधील शिवशाही बसमध्ये तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराराष्ट्र हादरला आहे. अत्याचारानंतर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आज पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये पुण्यातील पीडित तरुणीवर दोनदा बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे.

pune
Amravati Crime : मित्रासोबत बाहेर जाताना घेरलं, माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; मस्साजोगचं लोण हळूहळू इतर जिल्ह्यात

पुण्यातील पीडित तरुणीचा मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. आज बुधवारी संध्याकाळी ससून रुग्णालयाने पोलिसांना वैद्यकीय अहवाल दिला आहे.

pune
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट डेपोतील बलात्काराच्या घटनेनंतर 'साम'चे परखड सवाल

पुण्यातील पीडित तरुणीवर दोनदा बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. मेडिकल रिपोर्टमधून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. या धक्कादायक माहितीने खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पीडितेवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

pune
Pune Crime : शिवशाहीत तरूणीवर बलात्कार करणारा नराधम दत्ता गाडे कोण?

आरोपीचं शेवटचं लोकेशन कुठं होतं?

पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मोबाईलवर आलेले कॉल आणि संपर्कातील व्यक्तीची चौकशी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत २० जणांची चौकशी केली. आरोपीचं शेवटचं लोकेशन शिरूर हे दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी बंद झालं. या प्रकरणात रात्री आणखी टीम वाढवल्या जाणार आहेत. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com