Eknath Shinde : धमक्या देणाऱ्यांना धमकी कोण देणार? मुख्यमंत्र्यांना धमकी प्रकरणावर शिवसेनेची प्रतिक्रिया

सरकारच सर्वांना धमक्या देत आहेत, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.
Eknath Shinde : धमक्या देणाऱ्यांना धमकी कोण देणार? मुख्यमंत्र्यांना धमकी प्रकरणावर शिवसेनेची प्रतिक्रिया
Published On

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणावर शिवसेनेची प्रतिक्रिया आली आहे. एकनाथ शिंदेंना मुळात धमक्या देईल हाच मुळात प्रश्न आहे. मात्र त्यांची चौकशी व्हावी असं शिवसेनेचे खासदार अरविंद सांवत यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde : धमक्या देणाऱ्यांना धमकी कोण देणार? मुख्यमंत्र्यांना धमकी प्रकरणावर शिवसेनेची प्रतिक्रिया
Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका; गुप्तचर विभागाला मिळाली माहिती

गृह खातं त्यांच्याचकडे आहे, त्यामुळे याची चौकशी करावी. खरं काय आहे ते शोधावं की जाणीवपूर्वक काही सुरुये, असं अगदी हसत अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांनी मुळात धमक्या कोण देईल हाच खरा प्रश्न आहे. कारण तेच सर्वांना धमक्या देत आहेत. सरकारच सर्वांना धमक्या देत आहेत, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.

Eknath Shinde : धमक्या देणाऱ्यांना धमकी कोण देणार? मुख्यमंत्र्यांना धमकी प्रकरणावर शिवसेनेची प्रतिक्रिया
'शिवसेना नावाचा ढाण्या वाघ सर्कशीतला वाघ झाला'; शिंदे गटाचे बाळासाहेबांना भावनिक पत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघाती हल्ला करून मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) योग्य खबरदारी घेतली आहे. तसेच पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही महिन्यांपूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

मुख्यमंत्र्यांना याआधी देखील पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच धमकीचा निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्र्यांना याआधी नक्षलवाद्यांनी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com