'शिवसेना नावाचा ढाण्या वाघ सर्कशीतला वाघ झाला'; शिंदे गटाचे बाळासाहेबांना भावनिक पत्र

'उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह, ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांच्याबरोबरच मोहापायी सत्तेत सहभागी'
Shivsena
ShivsenaSaam TV

मुंबई: दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गटाकडून शिवसैनिकांना भावनिक आवाहन केलं जात आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल करत शिवसेनेच्या आताच्या अवस्थेला कोण जबाबदार आहे. हे सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात टीका केली आहे.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना प्रतिकात्मक लिहिलेल्या या पत्रात आम्ही आपलेच प्रामाणिक शिवसैनिक आहोत हे ही शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. हे पत्र कट्टर शिवसैनिकांचं बाळासाहेबांना भावनिक पत्र असं लिहित या पत्रातून शिंदे गटाने मनातील सल बाहेर काढल्याचं पाहायला मिळतं आहे.

पाहा व्हिडीओ -

हे पत्राचा व्हिडीओ शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पत्रात म्हटलं आहे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना सस्नेह जय महाराष्ट्र! साहेब तुम्ही दिला आणि आपल्या शिवसेनेच्या वाघाला कोण्या शिकाऱ्याने गुंगीचा इंजेक्शन दिलं या गुंगीचे इंजेक्शनचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला शिवसेनेचा (Shivsena) कणा हळूहळू मोडताना पाहून तुमच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील साहेब, आम्हाला हे सगळं दिसत होतं.

पण, उद्धव साहेबांना आणि आदित्यला सांभाळू घ्या या तुम्हाला दिलेल्या वचनामुळेच आम्ही शांत होतो. तुम्हाला ज्या विचारांची चीड होती तेच विचार तत्त्व म्हणून आपल्या संघटनेत येऊ लागले. अनेक वेळा याबद्दल बोलायचा प्रयत्न केला पण आमचा आवाज दाबला जाऊ लागला.

रात्री जागून पोस्टर्स लावणाऱ्या मराठी आणि हिंदू अस्मिता टिकवण्याकरता झटताना पोलीस केसेस आणि दांडेही अंगावर घेणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांच्या एकाही शब्दाला किंमतच उरली नाही आणि आपली संघटना भरकटू लागली तुमच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या जुन्या जाणत्या शिवसेना नेत्यांनाही राजकारणातून भेदखल केलं गेलं असं लांबलचक पत्र मस्के यांनी फेसबुक वर शेअर केलं आहे.

या पत्राच्या शेवटी देखील उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला आहे, पत्रात म्हटलं आहे, शिवसेना नावाचा ढाण्या वाघ सर्कशीतला वाघ झाला. कित्येक शिवसैनिकांवर अन्याय झाला दबाव वाढला. सैनिकांनी सहन तरी किती सहन करायचं या सर्वात आपले नेते शांतच होते. निष्ठेच्या अग्नीपथावर माघार नसते हे आम्हाला माहित आहे, सेनेचे भविष्य धोक्यात आलं होतं. अन्यायाविरुद्ध पेटून उठा संघर्ष करा आणि जिंका असं तुम्ही सांगितलं होतं.

त्यानुसार आम्ही संघर्ष केला आता तुमच्या विचाराचं सरकार आलय, आपला शिवसेना धर्म नव्याने वाढतोय आणि तुमचा हिंदुत्वाचा वारसा पुढे घेऊन निघालोय. तुमच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या काँग्रेसी विचारातून वाघ बाहेर आला आहे. शिंदे नावाचा वाघ आहे तोवर हिंदुत्वाला जाग आहे. तुम्ही आमच्या रक्तात होतात, आहात आणि राहाल, जय हिंद! जय महाराष्ट्र! आपलाच निष्ठावंत शिवसैनिक अशा आशयाचं पत्र शिंदे गटाकडून व्हायरल करण्यात आलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com