दिपाली सय्यद यांची जीभ घसरली! मोदींबद्दल वापरला आक्षेपार्ह शब्द

Shivsena Leader Deepali Sayed Offinsive Comment On PM Modi : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना आक्षेपार्ह शब्द वापरला होता.
Shivsena Leader Deepali Sayed Offinsive Comment On PM Modi
Shivsena Leader Deepali Sayed Offinsive Comment On PM ModiSaam Tv
Published On

रुपाली बडवे

मुंबई: शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद (Deepali Sayed) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द (Offensive Comment) वापरला आहे. भाजपमध्ये घोटाळेबाज मंत्र्यांना पाठिंबा दिला जातो असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. दिपाली सैय्यद यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात दिपाली सैय्यद म्हणाल्या की, "किरीट सोमय्याने आरोप केल्यानंतर मंत्री बीजेपीमध्ये जाऊन पवित्र होतात. मग पंतप्रधान त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या घोटाळ्याबाबत नंतर त्यांना कुणीच काही बोलत नाही. असा *@#*%@% (आक्षेपार्ह शब्द) पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल" अशी खोचक टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. (Shivsena Leader Deepali Sayed Offinsive Comment On PM Modi)

हे देखील पाहा -

सोमय्यांचीही जीभ घसरली

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना आक्षेपार्ह शब्द वापरला. सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वापरलेला तोच आक्षेपार्ह शब्द आता शिवसेना नेत्या दिपाली सैय्यद यांनी वापरला आहे.

Shivsena Leader Deepali Sayed Offinsive Comment On PM Modi
Video : सोमय्यांची जीभ घसरली! मुख्यमंत्र्यांवर टीका करताना वापरला आक्षेपार्ह शब्द

सोमय्या काय म्हणाले होते?

ईडीच्या सुरु असलेल्या कारवाई संदर्भात दापोलीतील रिसॉर्टशी माझा कोणताही संबंध नाही असा दावा काल मंत्री अनिल परब यांनी केला. यावर प्रत्युत्तर देत किरीट सोमय्या यांनी दापोलीतील २५ कोटीचा रिसॉर्ट यांचा आहे, असं सांगत मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत टीका करत असताना सोमय्या त्यांची जीभ घसरली. उद्धव ठाकरे यांनी १९ बंगल्यांचं नाटक केलं, आता परब नाटक करत आहे, त्यांना नोबेल मिळालं पाहिजे. असा खोटारडा मुख्यमंत्री महाराष्ट्राने याआधी पाहिला नाही असं वक्त्यव्य करताना किरीट सोमय्या यांची जीभ घसरली. तसेच परब यांची कारवाई पूर्ण झाल्यानंतर यशवंत जाधव यांची कारवाई सुरू होणार त्यानंतर मुख्यमंत्री यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडी करवाई होणार असून पुढचा नंबर त्यांचा असल्याचा इशारा देत सोमय्या यांनी श्रीधर पाटणकर हाजिर हो... अशी खोचक टीका केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com