Ravindra Pardeshi, Thane, Shivsena
Ravindra Pardeshi, Thane, Shivsenasaam tv

Thane News: ठाण्यात शिवसेना उपविभाग प्रमुखाचा खून

Shivsena News: पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहे.
Published on

Thane Jambhli Naka : ठाण्यातील जांभळी नाका येथे शिवसेनेचे (shivsena) उपविभाग प्रमुख रवींद्र परदेशी (ravindra pardeshi) यांचा मंगळवारी रात्री खून झाला. या खूनाच्या प्रकरणी अज्ञातांवर पाेलिसांनी (police) गुन्हा नाेंदविला आहे. (Maharashtra News)

रवींद्र परदेशी यांचा ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत कटलरीचा व्यवसाय आहे. अंतर्गत वादातून त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मगंळवारी रात्री दहाच्या सुमारास रवींद्र हे घरी जात असताना दोन जणांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.

Ravindra Pardeshi, Thane, Shivsena
Dance Bar : साम टीव्हीनं सरकारला केलं जागं; डान्सबारवर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही..., (पाहा व्हिडिओ)

रवींद्र परदेशी यांच्या डोक्यात चाॅपरने हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्या नंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. फेरीवाल्यांच्या धांद्यातून वाद होऊन हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज जयराज रणवरे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक यांनी वर्तविला आहे. या घटनेचा तपास ठाणे नगर पोलीस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com