Sunil Prabhu car accident in Vile Parle Mumbai : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारने एका पादचाऱ्याला धडक दिल्याची दुर्घटना समोर आली आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरात ही घटना घडली असून, या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. अपघात झाला त्यावेळी सुनील प्रभू कारमध्येच होते, अशीही माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव सुनील धुलविया असे आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी आमदार सुनील प्रभू स्वतः कारमध्ये उपस्थित होते, मात्र गाडी त्यांचा चालक चालवत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले परिसरातून प्रवास करत असताना आमदार प्रभू यांच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्यावरून जाणाऱ्या सुनील धुलविया यांना धडक दिली. धडक बसताच परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली.
धुलविया यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.