Ladki Bahin Yojana: गणपती विसर्जनावेळी 'लाडक्या बहिणीं'ना मोठं गिफ्ट! खात्यात कधी येणार १५०० रुपये? समोर आली नवी अपडेट

Ladki Bahin Yojana August 1500 installment payment date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार २४ सप्टेंबरनंतर पात्र महिलांच्या खात्यात पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana July Instalment Update
Ladki Bahin Yojana July Instalment Updatemeta ai
Published On

Ladki Bahin Yojana August installment date : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुढील आठवड्यात गणपती विसर्जनाच्या काळात पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यातील पात्र १ कोटी ६६ लाख महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यांचा हप्ता जमा होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, माहिती संभाव्य अपडेट म्हणून पाहावी.

(Maharashtra Ladki Bahin August payment, Ladki Bahin Yojana 2026)

तांत्रिक कारणांमुळे हप्ता लांबणीवर when will Ladki Bahin August installment be credited

गौरी-गणपतीच्या सणाचे औचित्य साधून ऑगस्ट महिन्याचा निधी महिलांच्या खात्यावर जमा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय कामांमुळे ही वेळ थोडी पुढे ढकलली गेली आहे. आता महिला व बाल विकास मंत्रालयाकडून निधी वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून थेट बँक खात्यात (DBT द्वारे) हे पैसे जमा केले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana July Instalment Update
Rahul Gandhi : आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, आता तृणमूल... राहुल गांधींच्या पोस्टने राजकीय वर्तुळात भूकंप

२४ सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात २४ सप्टेंबरनंतर राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. हे पैसे टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातील.

ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनावेळी लाडक्या बहि‍णींना जुलै महिन्याचा निधी दिला होता. आता गौरी गणपतीत १५०० खात्यावर येईल, असे म्हटले जात होते. पण ऑगस्ट महिन्याचा निधी हा पुढील आठवड्यात २४ तारखेनंतर जमा होऊ शकतो.

Ladki Bahin Yojana July Instalment Update
क्रूरतेची सीमा ओलांडली! राजधानीत अल्पवयीन मुलांनी रचला भयंकर कट; तरुणीसोबत नको ते केलं अन्...

१ कोटी ६६ लाख महिलांना मिळणार दिलासा

या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. याआधी जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून देण्यात आला होता. आता सणासुदीच्या काळात होणाऱ्या खर्चासाठी हे १५०० रुपये मिळणार असल्याने राज्यातील महिला वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com