

वसई विरार - महापालिका निवडणुकांच्या Election पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी विविध प्रकारच्या उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. कारण वसई विरारमध्ये Vasai Virar असे चित्र दिसून येऊ लागले आहे. विरार येथील साईनाथनगरमध्ये गटारीनिमित्ताने शिवसेनेतर्फे Shivsena सवलतीच्या दरात चिकन Chiken उपलब्ध करून देणार असल्याचे फलक लावण्यात आला आहे. या जाहिरात फलकामुळे सर्वत्र या उपक्रमाची चांगलीच चर्चा आता रंगू लागली आहे.
हे देखील पहा -
रविवारी येणार्या गटारी अमावस्यानिमित्त विरार-साईनाथ नगर शाखेच्या वतीने प्रतिव्यक्ती एक किलो चिकन १८० रुपये किलो या दराने देण्यात येणार आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेतच वसईकरांना ही संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सध्या स्थितीत चिकनचे दर हे २४० ते २६० प्रतिकिलो आहेत.
अशात सवलतीच्या दरात चिकन मिळणार असल्याने खवय्ये मंडळींना याचा चांगलाच फायदा होणार आहे. चिकन घेण्यासाठी नागरिकांना आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. शिवसेनेच्या या सवलतीच्या दरात चिकन वाटपात आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीची गणिते दडली असल्याचे बोलले जात आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.