पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Shiv Sena MP Sanjay Dina Patil : पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी सुरू झालेल्या वादामुळे शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. संजय पाटील यांच्या वक्तव्यांवरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
Shiv Sena MP Sanjay Dina Patil
SANJAY DINA PATIL EXPRESSES REGRET AFTER JOURNALIST THREAT CONTROVERSYsaam tv
Published On
Summary
  • पत्रकार शिवीगाळ आणि धमकी प्रकरणानंतर संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली.

  • वाढत्या वादानंतर शिंदेसेनेच्या खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

  • पत्रकार संघटना आणि विविध स्तरांतून या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

नुकतेच ठाकरे गटातून शिवसेना शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अरेरावीची भाषा केली. राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. त्यांच्या मारहाण करण्याच्या वक्तव्यानंतर संजय दीना पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली. यानंतर आता संजय दिना पाटील यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. जो प्रकार माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये झाला आहे, त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो असे पाटील यांनी म्हणालेत.

Shiv Sena MP Sanjay Dina Patil
Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

शिंदे गटात प्रवेश केल्यापासून मला शिवीगाळ केली जात आहे. वाईट शब्द बोलून हिणवलं जातंय. तरीपण मी सर्व अपमान सहन केले. मला आपण जे शिव्या देतात ते ठीक आहे. पण माझ्या परिवाराला माझ्या मुलीला, पत्नीला माझ्या वडिलांना देखील शिवीगाळ केली जात आहेत, त्यांना राजकारणापासून लांब ठेवा.

आजही त्यांच्यावर शिवीगाळ झाली. त्यावरून पत्रकार विचारणा करत होते, त्याला मी विरोध केला आणि थांबण्यास लावलं परंतु ते झालं नाही. त्यात माझ्यात आणि पत्रकारांमध्ये वाद झाला, माझ्याकडून मला जे बोलायचे नव्हते ते बोलल्या गेले. चुकीने काहीतरी अपशब्द निघाले मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं संजय दीना पाटील म्हणाले.

काय म्हणाले संजय पाटील?

​जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे, त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते, तरी पण मी सर्व अपमान सहन केले. तरीसुद्धा आज सकाळी परत ते पत्रकार मित्र आले होते, मी त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा याबद्दल आपण काहीही मला विचारू नका. जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे, आता कृपा करून काही बोलू नका. मी हात जोडून त्यांना विनंती केली, वारंवार मी सांगत आलेलो आहे की बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे.

मला आपण जे शिव्या देताय ते ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देताय, त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलो. तरीसुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या. आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारणा करता आल्या.

माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली, पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं, त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले, मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय.

Shiv Sena MP Sanjay Dina Patil
Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कोकणातील बड्या नेत्याने मशाल घेतली हाती

कृपा करून आपण मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय, त्याच्यासाठी ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईला आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com