
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई : मुंबईत अपघाताचं सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर शिवेसना खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला रविवारी रात्री अपघात झाल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरीच्या आसपास ही अपघाताची घटना घडली आहे. रवींद्र वायकर यांच्या अपघातानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शिवसेना खासदार रवींद्र कारला अपघात झाल्याची घडली आहे. जोगेश्वरीजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. वायकर यांच्या कारचा अपघात हा जोगेश्वरी एसआरपी कॅम्पच्या प्रवेश द्वाराजवळ झाला आहे. या अपघातानंतर स्थानिक लोकही घटनास्थळी पोहचले.
पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ वायकरांच्या कारला अपघात झाला आहे. अपघातावेळी रवींद्र वायकर हे स्वत: गाडीत असल्याची माहिती हाती आहे. तर अपघातातील आरोपी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती हाती आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
दरम्यान, रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा खासदार आहेत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे वायकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा परभव केला होता. या निवडणुकीत रवींद्र वायकर यांचा ४८ मतांनी विजय झाला. या विजयावर आक्षेप घेत अमोल कीर्तिकर यांनी कोर्टात धाव घेत खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
काही दिवसांपूर्वी कांदिवलीत अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारलाही अपघात झाला होता. कोठारेच्या कार चालकाने दोन मजुरांना उडवले होते. जवळील मेट्रो प्रकल्पावर काम करणारे दोन्ही मजूर आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. कांदिवलीत झालेल्या भीषण अपघातात उर्मिला आणि तिचा कार चालकही अपघातात जखमी झाला हो
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.