Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?

Shiv Sena Thackeray Group And Shinde Group Dussehra Melava: मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांचे दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?
Shiv Sena Dussehra MelavaSaam Tv
Published On: 
  • मुंबईत दोन शिवसेनेचे दसरा मेळावे

  • उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार आहे

  • एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणार आहे

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडून होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही शिवसेनेचे मुंबईत दसरा मेळावे होणार आहेत. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदेगटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईत तोफा धडाडणार आहेत. दोन्ही नेते या मेळाव्यात नेमकं काय बोलणार? आणि काय घोषणा करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या मेळाव्यासाठी राज्यभरातून दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते येणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवरच होणार आहेत. तर शिवसेना शिंदेगटाचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानावर होणार आहे. या मेळाव्यातून नेमका काय राजकीय संदेश दिला जातोय याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या दसरा मेळाव्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची धडाकेबाज भाषणे होणार आहेत. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या मेळाव्यात नेमक्या काय घोषणा केल्या जातील हे पाहणं महत्वाचे राहिल.

Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?
Maharashtra Politics: मोठी बातमी! दसऱ्यानंतर शिवसेनेत होणार मोठे फेरबदल, एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास सुरू होईल. हा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. या मेळाव्यादरम्यान शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, अनिल परब या नेत्यांची भाषणे होणार आहेत. तर शिवसेना शिंदेगटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणार आहे. या मेळाव्यादरम्यान शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे, भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, संजय शिरसाठ, रामदास कदम, श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत या नेत्यांची भाषणे होणार आहे.

Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?
Politics: आणखी एका पक्षात फूट; 12 आमदारांपैकी 8 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, दादर येथील शिवाजीपार्क हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे ऐतिहासिक ठिकाण आहे. याच शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १९६६ मध्ये पहिला दसरा मेळावा झाला होता. मराठी माणसाच्या हक्कांचा मुद्दा घेऊन शिवसेनेच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली. या प्रवासात शिवाजी पार्क हे मैदान खूप महत्वाचे मानले जाते. हळूहळू या मैदानाची ओळख शिवतीर्थ अशी झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी याच मैदानात दसरा मेळावा घेण्याची परंपरा कायम ठेवली. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झाले. त्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कायम याच मैदानावर आपला दसरा मेळावा घेतला.

Shiv Sena Dussehra Melava: शिंदे अन् ठाकरेंची आज तोफ धडाडणार, दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी; कुठे अन् किती वाजता होणार सभा?
Maharashtra Politics: वडेट्टीवार अन् भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांना व्हायचंय मुख्यमंत्री; मनातलं आलं ओठांवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com