Hindi Language Controversy : हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंची शिवसेना-मनसेचं एकत्र आंदोलन, शासनाच्या परिपत्रकाची होळी

Hindi Controversy : हिंदी सक्ती विरोधात पाच जुलैला होणाऱ्या मोर्च्याच्या पार्श्ववभूमीवर कल्याण येथे मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी मिळून शासनाच्या परिपत्रकाची होळी करत निषेध नोंदवणार आहेत.
MNS
Maharashtra Politics Saam tv
Published On

मराठी - हिंदी भाषेचा वाद राज्याच्या राजकारणात जोर धरू लागला आहे. या वादात महायुती सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या हिंदी सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे एकत्र येत ५ जुलै रोजी गिरगावचौपाटी येथून मोर्चा काढणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर आज कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते पदाधिकारी हिंदी सक्ती बाबतच्या शासनाच्या परिपत्रकाची होळी करत शासनाचा सरकारचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती ठाकरे गट आणि मनसेच्या शहरप्रमुखांकडून देण्यात आली . या मोर्चा निमित्त मनसे आणि ठाकरे गट एकत्र आल्याने युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

हिंदी सक्ती विरोधात ५ जुलै रोजी मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय .दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशी इच्छा अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. हिंदी सक्ती विरोधात पाच जुलै रोजी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा एकत्रित मोर्चा निघणार आहे . तर दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू असताना महिनाभरापूर्वी पलावा पुलाच्या आंदोलनात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि मनसे नेते राजू पाटील दोघे एकत्र दिसले होते. ठाकरे गटासह आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पलावा पुलाबाबत आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवाला होता. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे चर्चा रंगली होती. याबाबत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे तसेच मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या.

MNS
Hindi Langauage: संदीप देशपांडेंची मराठी माणसांना मोर्चात सहभागी होण्यासाठी हाक; लोकलमधील प्रवाशांना काय सांगितलं? पाहा व्हिडिओ

या चर्चा सुरू असतानाच हिंदी सक्ती विरोधात आता राज ठाकरे व उद्धव ठाकरे दोघे बंधू भाऊ एकत्र आलेत पाच जुलै रोजी मुंबईत ठाकरे गट व मनसे दोघांचाही विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये उद्या ठाकरे गट व मनसेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून एकत्रितपणे आंदोलन करत हिंदी सक्तीचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.

MNS
Hindi Language Controversy : मोठी बातमी! हिंदी सक्तीविरोधात उद्धव-राज ठाकरेंचा एकत्र मोर्चा निघणार? मनसेचा ठाकरेंना नवा प्रस्ताव

यावेळी हिंदी सक्ती बाबत शासनाने काढलेल्या परिपत्रकाची होळी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे शहर प्रमुख बाळा परब आणि मनसेचे शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली. तसेच याबाबत शनिवारी शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण मधील मध्यवर्ती शाखेत बैठक झाली असून या बैठकीत उद्याच्या आंदोलनासह येत्या पाच तारखेला मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी कल्याण डोंबिवली मधून देखील मोठ्या प्रमाणात ठाकरे गट तसेच मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी जाणार आहेत. त्यासाठी नियोजन देखील करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com