
संजय गडदे, साम टीव्ही
मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी शिवसेना पक्षाची निर्मिती झाली. मात्र आता शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून मराठी माणसावरच अन्याय सुरू असल्याचा प्रकार जानेवारी महिन्यात उघडकीस आला. कांदिवली पश्चिमेकडील इराणीवाडीतील विभाग प्रमुखाने एका मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा प्रकार समोर आलाय.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील इराणीवाडी येथे राहणाऱ्या पै कुटुंबीयांच्या मालकीचे दुकान विकत घेऊन फक्त इसार म्हणून काही रक्कम देऊन उर्वरित रक्कम न देता शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित यांनी दुकानावर ताबा घेतलाय. इसार म्हणून काही पैसे राजपुरोहित यांनी पै कुटुंबीयांना दिले. मात्र बाकीचे पैसे देण्यास राजपुरोहित यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे.
दुकानाच्या जागेवर आता शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राज पुरोहित यांनी आपले संपर्क कार्यालय उभारलंय. दुकानाच्या व्यवहारातील उर्वरित रक्कम पै कुटुंब राजपुरोहित यांच्याकडे मागण्यासाठी गेले तेव्हा त्यांना जीवे मारण्याची धमकी राजपुरोहित यांनी दिली, असा गंभीर आरोप पै कुटुंबीयांनी केलाय. याप्रकरणी पै कुटुंबांनी पूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता अखेरीस आज शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख लालसिंग राज पुरोहित आणि हरीश माकडिया यांच्याविरोधात कांदिवली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.मिळालेल्या माहितीनुसार,चारकोप कांदिवली परिसरात राहणाऱ्या दत्ताराम पै यांनी त्यांचा दुकानाचा गाळा शिवसेना शिंदे गटाचा विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित यांने भाड्याने घेतला. यासाठी हरीश माकडीया,किया हितेश अजानी यांच्या नावे भाडे करार करण्यात आला आणि दुकानाचे भाडे लालसिंग राजपुरोहित देणार असे ठरले.
हा गाळा दिनांक 01/05/2019 ते दिनांक 31/01/2022 या कालावधीकरीता 33 महिन्याचे भाडे तत्त्वावर देण्याचे ठरवून 1 लाख रूपये डिपॉझिट आणि 16 हजार रूपये भाडे देण्याचे ठरवण्यात आले. ठरल्याप्रमाणे त्यांनी डिपॉझिटचे 1 लाख रूपये व 16 हजार रूपये भाडे, असे दोन चेक दिले. यानंतर सलग तीन महिने पै कुटुंबीयांना गाळ्याचे भाडे भेटले. मात्र यानंतर दत्ताराम पै हे आजारी असल्याचे समजल्यानंतर लालसिंग राजपुरोहित हरीश माकदिया आणि अश्विन गोहिल यांनी पै कुटुंबीयांच्या घरी जाऊन दुकान 57 लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरवले.
सात डिसेंबर 2019 रोजी लालसिंग राजपुरोहित हरीश माकदिया यांच्या नावाने तयार करून आणलेल्या सेल एग्रीमेंटवर पै कुटुंबीयांनी सह्या केल्या. यावेळी दोन दिवसात 5 लाख टोकन देण्याचे आणि उरलेले 52 लाख रूपये 90 दिवसात देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे हरीश माकडीया आणि अश्विन गोहिल यांनी पै कुटुंबाच्या घरी येवून चार लाख रूपये रोख स्वरूपात देवून दोन महिन्यात राहिलेले 52 लाख रूपये देतो असे सांगून निघून गेले.
दोन महिन्यात उरलेले पैसे न आल्यामुळे फेब्रुवारी 2020 मध्ये पै कुटुंबीय लालसिंग राजपुरोहित यांच्या ऑफीसमध्ये गेले. ठरल्याप्रमाणे व्यवहाराचे पैसे मागितले मात्र आमच्याकडे सध्या पैसे नाहीत पैसे आले की आम्ही तुम्हाला देऊ असे लालसिंग राजपुरोहित यांच्याकडून पै कुटुंबीयांना सांगण्यात आले. यावेळी पै कुटुंबीयांनी ठरल्याप्रमाणे पैसे द्या अन्यथा, शॉप आम्हाला परत द्या असे सांगितले. मात्र पै कुटुंबीयांच्या या मागणीमुळे लालसिंग राज पुरोहित यांना राग आला आणि त्यांनी पै कुटुंबीयांना शिवीगाळ करत जास्त माजल्यासारखे करू नका, असं म्हटलं.
दुकानाचे पैसे मिळणार नाहीत फार तर भाड्याचे पैसे अधून मधून देत राहू असे लाल शिंगणे दत्ताराम पै यांना म्हटलं. मात्र सेल एग्रीमेंटमध्ये ठरल्याप्रमाणे पैसे देण्याऐवजी लालसिंग राजपुरोहित याने पै कुटुंबीयांना शिवीगाळ करत धक्के मारून बाहेर काढले. यानंतर काही काळ भाड्याचे पैसे म्हणून पै कुटुंबीयांना काही रक्कम ठराविक महिन्यानंतर मिळत राहिले. मात्र दत्ताराम पै यांना पक्षघाताचा झटका आल्यानंतर कुटुंबीयांनी पुन्हा लालसिंगकडे पैसे मागितले, मात्र त्यांनी पैसे न देता पुन्हा पैसे मागितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर पै कुटुंबियांनी लालसिंग विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती, मात्र कांदिवली पोलिसांनी लालसिंगविरोधात गुन्हा देखील दाखल करून घेतला नाही. मात्र आता कांदिवली पोलिसांनी कुटुंबीयांना 7 मार्च रोजी पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांच्या तक्रार अर्जानुसार लालसिंग राजपुरोहित हरीश माकडिया नितेश आजानी यांच्याविरोधात धमकावणे आणि फसवणूक करणे प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.