Pune News : आपल्या मुलांना सांभाळा, रस्त्यावर वाढदिवस, धांगड धिंगा चालणार नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा सज्जड दम

Pune Police Commissioner Amitesh Kumar : रस्त्यावर वाढदिवस साजरा करून धांगड धिंगाणा अजिबात चालणार नाही. आई वडिलांवर आपल्या मुलांवर नियंत्रण लावण्याची जबाबदारी आहे.
Police Commissioner Amitesh Kumar
Police Commissioner Amitesh Kumar Saam Tv News
Published On

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रात्री १२ वाजता रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरा करण्याची पद्धत जोर धरू लागली आहे. रात्री १२ वाजता एखाद्याचा वाढदिवस असेल तर मोठ्या प्रमाणावर टोळक्यांकडून फटाके फोडून, मोठ्याने साउंड लावून धिंगाणा घालत वाढदिवस साजरा होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. यावरच आता थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड दम आणि असे कृत्य करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.

रस्त्यावर वाढदिवस साजरा करून धांगड धिंगाणा अजिबात चालणार नाही. लपून छपून कोणी हे कृत्य करून लपून बसत असेल तर ठीके पण ज्यादिवशी तो व्यक्ती पकडला जाईल तर त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना जबाबदारी घ्यावी लागेल, अशा स्पष्ट सूचना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत. पुण्यात कोंढवा पोलीस ठाणे आणि मरकजी बैतूल माल फाऊंडेशन आयोजित एका कार्यक्रमात अमितेश कुमार बोलत होते.

Police Commissioner Amitesh Kumar
Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर २ दिवसांचा विशेष ब्लॉक, लोकल वाहतुकीत अनेक बदल; वाचा वेळापत्रक

रस्त्यावर वाढदिवस साजरा करून धांगड धिंगाणा अजिबात चालणार नाही. आई वडिलांवर आपल्या मुलांवर नियंत्रण लावण्याची जबाबदारी आहे. आई वडिलांचं ऐकत नसतील तर आमची मदत घ्या, त्याचं मन परिवर्तन आम्ही करू, ते कसं करायचं याची पद्धत आम्हाला येते. जर तुम्ही नागरिकांनी सुद्धा जबाबदारी घेतली तर रस्त्यावर कुठला ही दादा जन्माला येणार नाही.

सध्या अनेक जणं वाढदिवसाच्या निमित्ताने रस्त्यावर केक कापताना दिसत आहेत. नुकतीच एक घटना कोंढव्यातील पारघेनगर मध्ये घडली परंतु त्यातील तो व्यक्ती पळून गेला, जेव्हा सापडेल तेव्हा त्याचा प्रत्येक वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा होईल आणि तिथेच त्याचा केक कापला जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी यावेळी बोलताना दिली.

Police Commissioner Amitesh Kumar
Satish Bhosale Video : थारा पैसा, थारा नाम; अंगावर पैशांची उधळण, सतीश भोसलेचा माज, नोटांचे बंडल फेकत दुसरा Video समोर

पुण्यातील अवैध धंदे करत असलेल्यांना आयुक्तांनी सक्त ताकीद दिली आहे. आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहरात अवैध धंद्यांना हद्दपार करू या गोष्टीला अजून पूर्णपणे यश आलेलं नाही. अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत अशी कुठली ही शंका मनामध्ये ठेऊ नका. असे धंदे करणाऱ्या लोकांना पोलिसांकडून ताकीद आहे की ज्या दिवशी आमच्या तावडीत सापडाल तेव्हा तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागेल.

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन

पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री बाराच्या सुमारास फटाक्याची आतषबाजी करत गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या प्रकरणी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कारवाई करत "बर्थडे बॉय" पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, विजय मोरे आणि सुहास डंगारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीय.

Police Commissioner Amitesh Kumar
Pune News: व्हिडिओ काढून महिलांना ब्लॅकमेल करायचा, मोबाईल शोधण्यासाठी पोलीस दत्ता गाडेच्या गावात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com