Satish Bhosale Video : थारा पैसा, थारा नाम; अंगावर पैशांची उधळण, सतीश भोसलेचा माज, नोटांचे बंडल फेकत दुसरा Video समोर

Beed Satish Bhosale Video : सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी तर आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे. सतीश भोसले हा गेल्या पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे.
Satish Bhosale throwing bundles of notes Another video
Satish Bhosale throwing bundles of notes Another video Saam Tv News
Published On

बीड : दिवंगत संतोष भोसले हत्या प्रकरणानंतर बीडमधील राजकारण ढवळून निघालं आहे. तसेच गुन्हेगारीने देखील तोंड वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतीश भोसले उर्फ खोक्या या कुख्यात गुंडाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. बाप लेकाला मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीडमधील नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, या गुंडाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोफ्यावर बसून टेबल नोटांचे बंडल फेकत असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात त्याच्या अंगावर त्याचा सहकारी नोटांची उधळण करताना दिसत आहे.

सतीश भोसले हा भाजपचा पदाधिकारी तर आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे. सतीश भोसले हा गेल्या पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे. भाजपच्या महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली, तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केलं. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. आमदार सुरेश धस यांच्याशी संपर्क वाढल्याने त्याची जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात त्याचा दबदबा निर्माण झाला. आता गेल्या २४ तासात त्याचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सतीश भोसले याची चर्चा सुरू झाली आहे.

Satish Bhosale throwing bundles of notes Another video
Santosh Deshmukh PM Report: आरोपींचे राक्षसी कृत्य, संतोष देशमुखांना अमानूष मारहाण; बरगडी,गुडघे-नडगी तोडली|VIDEO

सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक करा आणि आमदार सुरेश धस यांच्यावर देखील गुन्हा नोंद करा अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी शिरूर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. जोपर्यंत सतीश भोसले आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. शिरूर येथील खोक्या नावाच्या गुंडाने बावी गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केली होती.

Satish Bhosale throwing bundles of notes Another video
Central Railway: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता १५ डब्ब्यांच्या लोकल दुप्पट होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com