NCP Party : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका

Sharad Pawar Group : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे. सुनावणी लवकरात लवकर घ्या म्हणत याचिका मेंन्शन करण्यात आली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam Digital
Published On

Mumbai News :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे. सुनावणी लवकरात लवकर घ्या म्हणत याचिका मेंन्शन करण्यात आली आहे. वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी हे प्रकरण मेंन्शन केलं आहे.

शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणीची तारीख देऊ असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मागणी केली की, प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी. कारण अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील आम्हाला अधिवेशनात व्हीप बजावू शकतात.कोर्टानेही आम्ही लवकर तारीख देऊ असं म्हटलं आहे.

आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल की सुनावणीची नक्की तारीख काय असेल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात अजून याचिका दाखल केलेली नाही. ती देखील लवकर दाखल होऊ शकते.

अजित पवार गट कॅव्हेट दाखल करणार

आमदार आपात्रता प्रकरणी विधिमंडळांने दिलेल्या निकाल प्रकरणी अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने विधिमंडळाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सावध पवित्रा घेण्यात आला आहे. आमदार आपात्रता प्रकरणी विधिमंडळाने दोन्ही गटातील आमदारांना पात्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात जाण्याची भूमिका घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com