Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंना अटक करा, अन्यथा कोर्टात जाणार; शरद पवार गटाचा राज्य सरकारला इशारा

Agitation in Pune against Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. असे न केल्यास आम्ही कोर्टात धाव घेऊ, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Agitation in Pune against Sambhaji Bhide
Agitation in Pune against Sambhaji BhideSaam TV

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वटपौर्णिमेच्या पूजेच्या अनुषंगाने महिलांबाबत एक विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. असे न केल्यास आम्ही कोर्टात धाव घेऊ, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Agitation in Pune against Sambhaji Bhide
VIDEO: Sambhaji Bhide यांनी महिलांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा Shubhangi Patil यांच्याकडून समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबतची माहिती दिली आहे. संभाजी भिडे (Sambhaji Bhide) नेहमीच महिलांच्या विरोधात वक्तव्य करतात. ते विकृत मनोवृत्तीचे असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय गुरु आहेत, अशी टीका जगताप यांनी केली.

पुण्यातील वारी पवित्र असून भिडे यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांची जागा तुरुंगात असून भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी देखील प्रशांत जगताप यांनी केली आहे. असं न केल्यास आम्ही मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, संभाजी भिडे गुरुजींनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलून नये, अन्यथा आम्ही त्यांच्या मिशा कापू, असा इशारा सोलापुरातील वर्ल्ड ऑफ वूमन्स या महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिला आहे. भिडे गुरुजी यांनी महिलांच्या वाटेला जाऊ नये. त्यांचं खूप अति होतंय. आम्हाला त्यांची विधाने ऐकवली जात नाही, असंही त्या म्हणाल्या.

आम्ही काय करावं आणि काय करू नये हे सांगणारे भिडे गुरुजी हे कोण आहेत? ते आमचं घर चालवत नाहीत, असंही विद्या यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर, यापुढे संभाजी भिडेंनी असे वादग्रस्त वक्तव्य केले तर त्यांचे पेहराव असणाऱ्या धोतरावर आम्ही बोलू शकतो. त्यांनी वाढवलेल्या मिशाही आम्हाला कापाव्या लागतील, असा इशाराच विद्या यांनी दिला आहे.

Agitation in Pune against Sambhaji Bhide
Vidhan Sabha Election : मोठी बातमी! विधानसभेची निवडणूक महायुती एकत्रित लढवणार; अजित पवार गटाला किती जागा मिळणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com