Milk Price Issue: उपोषणकर्त्यांसह डॉ. अजित नवलेंची प्रकृती ढासळली, दूधदर प्रश्नी शरद पवारांचे आंदाेलकांसह मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी असे शरद पवारांनी म्हटले आहे.
makarand anaspure meets ajit navle and farmers in akole on milk price issue andolan
makarand anaspure meets ajit navle and farmers in akole on milk price issue andolansaam tv
Published On

- सचिन बनसाेडे

Milk Price Issue :

दुधाला 34 रुपये दर द्यावा, दुध संकलन केंद्राकडून शेतक-यांची लूट थांबावी तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आदी मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून अकोले (जि. अहमदनगर) बेमुदत उपाेषणास बसलेल्या शेतक-यांसह किसान सभेचे डाॅ. अजित नवले (Ajit Navle) यांची प्रकृती ढासळली. दरम्यान अभिनेते मकरंद अनासपूरे (makarand anaspure) यांनी उपाेषणस्थळी आंदाेलकांची भेट घेत सरकारने तातडीने प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. (Maharashtra News)

दूध दरासाठी गेल्या सहा दिवसांपासून तहसिल कार्यालय येथे सुरु असलेल्या या आंदाेलनात आज शेतक-यांनी शेकडो गाई आणल्या. या तहसिल कार्यालयाचा आवार गायींनी भरुन गेला आहे. या उपोषणकर्ते तसेच डॉ. अजित नवले यांची प्रकृती ढासळली आहे.

makarand anaspure meets ajit navle and farmers in akole on milk price issue andolan
Success Story : माळरानावर सीताफळ बाग फुलवत शेतक-याने कमाविले लाखोंचे उत्पन्न

आज या आंदाेलकांची अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी उपोषणस्थळी भेट घेतली. अनासपुरे यांनी दुधदर प्रश्नी उपोषणकर्त्यांना पाठींबा दिला. ते म्हणाले शेतक-यांच्या मागण्या या रास्त आहेत. त्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. शेतक-यांच्या पाठीशी आम्ही कायम आहाेत असेही मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट केले.

उपाेषण मागे घेण्याचे शरद पवारांचे आवाहन

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'एक्स' वरुन उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी असे म्हटले आहे. तसेच उपोषण मागे घ्यावे असे आवाहन देखील केले आहे.

पवार यांनी शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांनी दूधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी असे म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

makarand anaspure meets ajit navle and farmers in akole on milk price issue andolan
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com