Shahapur Crime News : विवाहितेची गाेळी घालून हत्या, भावाच्या तक्रारीनंतर सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल

या घटनेचा अधिक तपास खर्डी पोलिस करीत आहेत.
Shahapur Crime News
Shahapur Crime Newssaam tv
Published On: 

- फय्याज शेख

Shahapur Crime News : विवाहितेची सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून हत्या केली घटना शहापूर तालुक्यात घडली. या घटनेनंतर पाेलीसांनी विवाहितेच्या भावाच्या तक्रारीनंतर चार जणांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Shahapur Crime News
Ganeshotsav 2023 : गणेशाेत्सव काळात गाैतमी पाटीलच्या ठुमक्यांवर बंदी, पाेलीसांचा निर्णय

शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथील रंजना शिवा भवर (वय 27) यांचा रात्री 12 च्या सुमारास हत्या झाली. या घटनेची माहिती मिळताच खर्डी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Shahapur Crime News
Ganeshotsav 2023 : ताशाचा आवाज तरर झाला गणपती माझा... राज्यभरात गणरायाचे आगमन, बच्चे कंपनीला माेदकांचे आकर्षण

त्यानंतर शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयातून जे.जे. रूग्णालयात रंजना यांचा मृतदेह पाठवण्यात आला. सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बूदूकीने गोळ्या घालून बहिणीची हत्या केल्याची तक्रार रंजना यांच्या भावाने पाेलिसांत केली.

त्यानूसार पाेलिसांनी रंजना यांच्या सासरच्या चार जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास खर्डी पोलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.