मुंबई : ठाकरे सरकारच गांजाच्या (Drugs) प्रेमात आहे. शरद पवार सांगत आहेत की हर्बल गांजा, तर नवाब मलिक सांगत आहेत की हलका गांजा आहे. तसचं महापौरांच्या मुलाला वरळी येथील कोविड सेंटरच काम कसं मिळालं आहे? महापौर यांचे चिरंजीव साईप्रसाद यांच्या क्रिश इंटरप्राझेस ला हा टेंडर मिळाला आहे आणि हे अपारदर्शक पद्धतीने दिले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.
किशोरी पेडणेकर यांना कोविड आवडतो -
शिवाय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 6 कोविड सेंटर कोणाला दिले हे जाहीर करावे कोविड सेंटर उभं तर केलं आहे पण रुग्ण कुठे आहेत? अगोदर कॉन्ट्रॅक्ट दिल जात आणि नंतर कंपनीची स्थापना केली जात आहे. माहिती लपवण्याचं काम केलं जातं आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना कोविड आवडत आहे. कारण महापौरांना त्यांच्या मुलाला कॉंट्रॅक्ट द्यायचं आहे तर ठाकरेंच्या लोकांना द्यायची असतात असंही ते म्हणाले. कोविड सेंटरची (Covid Center) डॉक्युमेंट देत नाहीत ते फाईल का लपवत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हे देखील पहा -
मुंबईमधील 25 ट्क्के बेडही भरले नाही -
दरम्यान एका दिवसात वीस हजार कोरोना रुग्ण (Corona Patient) सापडले म्हणतात मात्र त्या रुग्णांपैकी रुग्णालयांमध्ये किती पेशंट आहेत. तसंच जेवढे रुग्ण दवाखान्यात दाखल होतायत तेवढे रुग्ण बरे देखील होऊन दवाखान्यातून बरे होऊन जात असल्याचंही ते म्हणाले. तसेच मुंबईमधील बेड्सच्या संख्येपैकी अजून 25 ट्क्के बेडही भरले नसल्याचंही ते म्हणाले ठाकरे सरकार लोकांमध्ये कोरोनाची भिती निर्माण करत आहे कारण भिती कमाईचं साधन असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती केला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.