Dr. Mangala Narlikar No More: ज्येष्ठ गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर कालवश; ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dr. Mangala Narlikar Death: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी गणिततज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झालं आहे.
Dr. Mangala Narlikar
Dr. Mangala Narlikar Saam tv
Published On

Pune News: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी गणिततज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झालं आहे. डॉ. मंगला नारळीकर यांनी पुण्यात वयाच्या ८१ व्या अखेरचा श्वास घेतला. गणिततज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधनं झालं आहे. (Latest Marathi News)

डॉ. मंगला नारळीकर यांना गेल्या दोन महिन्यापासून कॅन्सरचा (Cancer) त्रास सुरू झाला होता. त्यामुळे या आजारामुळे नारळीकर या आजारी होत्या. डॉ. मंगला नारळीकर या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. नारळीकर यांना गीता, गिरिजा व लीलावती तीन कन्या आहेत.

Dr. Mangala Narlikar
Pune News: महावितरणाच्या हलगर्जीपणाने घेतला बळी! उघड्या डीपीचा विजेचा धक्का लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; नागरिकांमध्ये संताप

डॉ. मंगला नारळीकर यांच्या मृत्यूने नारळीकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. मंगला नारळीकर यांच्याकडे 'संश्लेषात्मक अंक सिद्धांत' या विषयात त्यांची पीएच.डी. होती. तसेच 'गणितगप्पा’, 'गणिताच्या सोप्या वाटा' यांसारखी पुस्तक त्यांनी लिहिली.

१९८६ साली वयाच्या ४३ व्या वर्षी कॅन्सरशी सामना करायची वेळ त्यांच्यावर आली होती. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरही डॉ. मंगला नारळीकर यांनी मात केली होती. गेले काही महिने त्यांना कॅन्सरचा पुन्हा एकदा त्रास सुरू झाला होता.

Dr. Mangala Narlikar
Pune Water Cut: पुणेकरांना दिलासा! आठवडाभरासाठी 'या' परिसरातील पाणीकपात मागे

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगला नारळीकरांनी खंबीरपणे साथ दिली. डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांच्या निधनाने नारळीकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com