Pune : मोठी बातमी! स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक; महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप

Pune Hadapsar police case updates : पुण्यात स्वयंघोषित धर्मगुरूने ‘मी महादेवाचा अवतार’ असल्याचा दावा करत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Pune Hadapsar police case updates
Pune Hadapsar police case updates
Published On

मी महादेवाचा अवतार आहे आणि तू पार्वती आहेस माझी असं म्हणत एका स्वयंघोषित धर्मगुरू ने या महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून या बाबाला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित पीडित महिलेने वसई येथील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सगळा गुन्हा पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. ऋषिकेश वैद्य असे या स्वयंघोषित धर्मगुरु चे नाव आहे. पुणे पोलिसांनी वैद्य याला पिंपरी मधून अटक केली. वैद्य याच्यावर पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Hadapsar police case updates
Ashok Kharat Case: महिलांच्या शोषणासाठी खरातचा 'कोडवर्ड'; SIT तपासात धक्कादायक खुलासा

पीडित महिला ३५ वर्षांची असून पुण्यात वास्तव्यास आहे. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२३ मध्ये तिची वसई येथील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री करून जवळीक केली. डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाठी पुण्यात आला.

यावेळी "मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस," असे तिला सांगितले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉज मध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.

Pune Hadapsar police case updates
Kharat Case : कोंबडीचोर खरात कसा बनला कॅप्टन? गावकऱ्यांनी काढली भोंदू खरातची कुंडली

दरम्यान, हे नाशिक मधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि तिथून हा गुन्हा पुण्यात वर्ग झाला.

आज सकाळपासून पुणे पोलिसांचे विविध पथकं वैद्य याचा शोध घेत होते अखेर संध्याकाळी त्याला पिंपरी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Pune Hadapsar police case updates
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंवर खासदार नाराज? बैठकीची 'इनसाईड स्टोरी'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com