ठाणे महापालिकेतील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या कथित बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणी सिद्दीकी अहमद यांनी तक्रार दाखल केल्यानंतर काही दिवस सहर शेख नॉट रिचेबल होत्या. मात्र आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांवर खुलासा केला.
पत्रकार परिषदेत सहर शेख यांचे वडील युनूस खान यांनी आरोपांवर जोरदार प्रतिउत्तर दिलं. आम्हाला जाणूनबुजून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्याकडे हे जात प्रमाणपत्र गेल्या १५ वर्षांपासून आहे. बनावट कागदपत्रांचा आरोप पूर्णपणे खोटा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, एका मुलीच्या राजकीय कारकिर्दीशी अशा प्रकारे खेळणं योग्य आहे का? असा सवालही युनूस खान यांनी उपस्थित केला.
सहर शेख म्हणाल्या, तहसीलदार उमेश पाटील यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केल्याचं सांगितलं. आम्ही मागितलेली माहिती चुकीची देण्यात आली असा आरोप त्यांनी केला. दरम्यान नगरसेवक पद रद्द होणार का, असा सवाल विचारण्यात आला असता सहर शेख यांनी स्पष्ट केलं की ठाणे महापालिकेकडून मला अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही.
या प्रकरणावर सहर शेख यांचे वडील युनूस खान यांनीही प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले. गेल्या १५ वर्षांपासून आमच्याकडे हे प्रमाणपत्र आहे. आम्हाला मुद्दाम टार्गेट केलं जातंय असं त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.