School : मुंबई पाठोपाठ ठाण्यातील शाळाही बंदच...

काही दिवसांपासून मुंबईमधील कोरोना (Corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसंच ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्णही आढळत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याचंही मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.
School : मुंबई पाठोपाठ ठाण्यातील शाळाही बंदच...
School : मुंबई पाठोपाठ ठाण्यातील शाळाही बंदच...Saam TV
Published On

नवी मुंबई : मुंबई महानगरपालिके पाठोपाठ आता ठाणे प्रशासनाने देखील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील (Thane) पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या शाळा 4 ते 31 जानेवारी पर्यंत बंद राहणार असल्याचं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

हे देखील पहा -

School : मुंबई पाठोपाठ ठाण्यातील शाळाही बंदच...
Mumbai : मुंबई वगळता इतर भागातील शाळा सुरू ठेवण्याची शिक्षण विभागाची भूमिका

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद ठेऊन ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची सूचना बीएमसी (BMC) शिक्षण विभागाने केल्यावरती लगेचच ठाणे प्रशासनाने देखील तेच नियम लागू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील कोरोना (Corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसंच ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्णही आढळत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याचंही मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं असल्याने त्या पार्श्वभूमिवरच आजचे शाळांबाबतचे निर्णय पालिकांनी स्पष्ट केले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com