मुंबई : मुंबई वगळता इतर भागातील शाळा सुरूच ठेवण्याची शिक्षण विभागाची भूमिका शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा (Vaccination) आढावा घेतला मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात कोराना रुग्णांची संख्या कमी आहे.
त्यामुळे राज्यातील शाळा (School) बंद न करता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुचना देल्या आहेत. राज्यात काल 11,877 रुग्ण आढळले होते, यात मुंबई परिसरातील रुग्णांचा आकडा 10,394 इतका आहे त्यामुळे मुंबईतील (Mumbai) शाळा बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी इतर भागातील शाळा सुरूच ठेवल्या जाणार असल्याचही त्यांनी भूमिका घेतली आहे. भविष्यात रुग्ण वाढल्यास स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.