Eknath Shinde: सातारा राड्यावरून शिंदेसेनेत खलबतं, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंची आमदार-मंत्र्यांसोबत बैठक; नेमका काय निर्णय घेतला?

Deputy CM Eknath Shinde On Satara Row: साताऱ्यातील राड्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. रात्री उशिरा मुंबईत शिंदेसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची ही बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय झाल? वाचा सविस्तर...
Eknath Shinde: सातारा राड्यावरून शिंदेसेनेत खलबतं, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंची आमदार-मंत्र्यांसोबत बैठक; नेमका काय निर्णय घेतला?
Deputy CM Eknath Shinde Saam Tv
Published On

Summary -

  • सातारा राड्यानंतर शिंदेसेनेत खळबळ

  • एकनाथ शिंदेंची उशिरा रात्री बैठक

  • आमदार-मंत्र्यांनी पोलिस आणि भाजपवर नाराजी व्यक्त केली

  • निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन

सातारा प्रकरणावरून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून झालेल्या राड्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. शिंदेसेनेच्या आमदारांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. आता नाराज शिंदेंनी पक्षाच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची मंगळवारी रात्री उशिरा बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी सातारा प्रकरणावरून चर्चा केली. सातारा प्रकरणावर चर्चा करताना पोलिस आणि भाजपच्या भूमिकेबाबत शिंदेसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री उशिरापर्यंत शिंदेसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतलीय. बैठकीला दादा भुसे, प्रकाश आबिटकर, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील हे सर्वजण उपस्थित होते. जिल्हाप्रमुखांनी देखील या बैठकीला उपस्थिती लावली होती. निवडणूक आयोगाकडून एसआयआर प्रक्रिया पुढील महिन्यापासून राबवली जाणार असून त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्री आणि आमदारांना मार्गदर्शन केले असल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde: सातारा राड्यावरून शिंदेसेनेत खलबतं, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंची आमदार-मंत्र्यांसोबत बैठक; नेमका काय निर्णय घेतला?
सर्वात मोठी बातमी! सातारा प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस नाराज; उपमुख्यमंत्री शिंदेंना दिला स्पष्ट इशारा, Inside Story समोर

एसआयआरबाबत शिंदेंनी सर्वांना फॉर्म कसे भरावे, कोणती काळजी घ्यावी याबाबत कार्यशाळा आणि मार्गदर्शन केले. एसआयआरकरिता लागणारी आवश्यक कागदपत्र आणि प्रश्नाबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. सोबतच आमदार आणि मंत्र्यांसह सातारा प्रकरणावरून एकनाथ शिंदे यांनी चर्चा केल्या असल्याची माहिती आहे. सातारा पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेत तीव्र नाराजी आहे. तसेच भाजपच्या भूमिकेबाबतही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आता सातारा प्रकरणावर शिंदेसेना नेमकी काय भूमिका घेतेय हे पाहणे महत्वाचे राहिल.

Eknath Shinde: सातारा राड्यावरून शिंदेसेनेत खलबतं, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंची आमदार-मंत्र्यांसोबत बैठक; नेमका काय निर्णय घेतला?
सर्वात मोठी बातमी! सातारा प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस नाराज; उपमुख्यमंत्री शिंदेंना दिला स्पष्ट इशारा, Inside Story समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com